शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या दिक्षा धबाले यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 17:12 IST

काँग्रेसच्या धबालेंना ७० ते भाजपच्या बेबीताई गुपिलेंना ४ मते

नांदेड : नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या दिक्षा कपिल धबाले यांची शनिवारी ७० विरुद्ध ४ अशा मतफरकाने निवड झाली. त्यांनी भाजपाच्या बेबीताई गुपिले यांचा दणदणीत पराभव केला. 

महापालिकेत शनिवारी झालेल्या विशेष सभेत पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची उपस्थिती होती. ११ वाजता सभेला सुरुवात झाली. १५ मिनिट अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला. कुणीही अर्ज मागे न घेतल्याने मतदान घेण्यात आले. हात उंचावून झालेल्या या मतदान प्रक्रियेत काँग्रेसच्या दिक्षा धबाले यांना ७० तर भाजपाच्या बेबीताई गुपिले यांना ४ मते मिळाली. धबाले यांनी एकतर्फी विजय मिळविला.महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. ८१ पैकी ७४ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. भाजपाचे ६, शिवसेना-१ आणि अपक्ष १ असे पक्षीय बल महापालिकेत आहे. 

शनिवारी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत एकूण सात सदस्य अनुपस्थित राहिले. त्यात काँग्रेसचे चार सदस्य तर भाजपाचे दोन आणि शिवसेनेचा एकमेव सदस्य अनुपस्थितीत होता. अनुपस्थितीत सदस्यांमध्ये काँग्रेसच्या दिपाली मोरे, संगीता बिरकले, आयशा बेगम, साबिया बेगम तर भाजपाच्या इंदुबाई घोगरे, दिपकसिंह रावत आणि शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांचा समावेश होता. काँग्रेसच्या निर्णयाप्रमाणे महापालिकेचे महापौरपद हे सव्वा वर्षासाठी निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार शिलाताई भवरे यांनी २२ मे रोजी राजीनामा दिला. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. ३० मे रोजी काँग्रेसकडून दिक्षा धबाले यांचा एकमेव अर्ज आला होता तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून बेबिताई गुपिले यांनी अर्ज दाखल केला होता. 

टॅग्स :Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस