रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल, बाहेर नातेवाइकांचे बेहाल, खायलाही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST2021-04-13T04:16:58+5:302021-04-13T04:16:58+5:30
आठ दिवसांपासून आईला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आता तब्येत चांगली आहे; परंतु नातेवाइकांची झोपायची व्यवस्था वा जेवणाची ...

रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल, बाहेर नातेवाइकांचे बेहाल, खायलाही मिळेना
आठ दिवसांपासून आईला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आता तब्येत चांगली आहे; परंतु नातेवाइकांची झोपायची व्यवस्था वा जेवणाची व्यवस्था नसल्याने आमचे हाल झाले. गाडीतच झोपून रात्र काढली.
- संतोष पाटील, मुलगा.
भाऊ आणि वडील रुग्णालयात दाखल आहेत. नांदेडातच घर आहे; परंतु काहीतरी लागेल, रुग्णाची अचानक तब्येत बिघडली तर, या धास्तीने रुग्णालयाबाहेरच दिवस-रात्र थांबून राहत आहे. त्यात इंजेक्शन मिळविण्यासाठी सर्वाधिक धावपळ होत आहे. - प्रिया दरगू
शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध झाल्याने अर्धे टेन्शन दूर झाले. जेवणही संस्थेकडून पुरविण्यात येते; परंतु रात्री झोपण्याची व्यवस्था नाही. तसेच रुग्णांच्या नातेवाइकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. परिसरातील स्वच्छतेवर लक्ष देणे गरजेचे आहे. - सखाराम अंबोरे, नातेवाईक
नातवाइकांकडे जाता येत नाही अन् बाहेरचेही काही खावे वाटत नाही.
कोरोनाच्या भीतीने नातेवाइकांकडे जाण्याची, तसेच बाहेरचे काही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे घरून आणलेला डबाच दोन-दोन दिवस पुरविला जातो. त्यात मोबाइल चार्जिंगची अडचण येत असल्याने कोणालाही संपर्क करता येत नाही.