ग्रामपंचायत मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:15 IST2021-01-15T04:15:38+5:302021-01-15T04:15:38+5:30

नांदेड - जिल्ह्यातील १ हजार १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या ...

Compensation leave for workers for Gram Panchayat voting | ग्रामपंचायत मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी

ग्रामपंचायत मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी

नांदेड - जिल्ह्यातील १ हजार १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक होणार आहे. त्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी १५ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदार असलेले शासकीय / निमशासकीय कर्मचारी, विविध आस्थापना, दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, रिटेलर्स येथील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तसेच शासकीय, निमशासकीय कर्मचारी, विविध आस्थापना यांना दोन तासांची सवलत देण्यात यावी. दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना व माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, रिटेलर्स इत्यादी येथील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. संबंधित मतदार मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिल्यास संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केली आहे.

Web Title: Compensation leave for workers for Gram Panchayat voting