राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे सामान्य माणसांपर्यंत पोहोचवा : भोसीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST2021-05-31T04:14:45+5:302021-05-31T04:14:45+5:30

नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, सर्व फ्रंटल सेलचे जिल्हाध्यक्ष यांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या ...

Communicate the goals of NCP to the common man: Bhosikar | राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे सामान्य माणसांपर्यंत पोहोचवा : भोसीकर

राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे सामान्य माणसांपर्यंत पोहोचवा : भोसीकर

नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, सर्व फ्रंटल सेलचे जिल्हाध्यक्ष यांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथे घेण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणीची निवड करून पक्षकार्य वाढवणे, गाव तेथे शाखा स्थापन करणे, आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी सर्व तयारीनिशी सज्ज राहावे. या सर्व निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर राहील, असे जिल्हाध्यक्ष भोसीकर यांनी सांगितले. आगामी काळात पक्षाचे संघटन बळकट करून जिल्ह्यात पक्षाला अव्वलस्थानी आणू. त्याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन पक्षवाढीसाठी काम करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डी. बी.जांभरूणकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष बालाजी शेळके ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पदवीधर सेल जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन जाधव, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रियंका कैवारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन पापंटवार, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष बालाजी माटोरे, शहराध्यक्ष गोविंद यादव, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस रेखा राहिरे, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शादुल होणवडजकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे देगलूरचे शहराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमावार, किनवट तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड, माहूर तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, हदगाव तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख, कंधार तालुकाध्यक्ष शिवदास धर्मापुरीकर, बिलोली तालुकाध्यक्ष नागनाथ पा. सावळीकर, नायगाव तालुकाध्यक्ष भास्कर भिलवंडे, लोहा तालुका कार्याध्यक्ष प्रल्हाद पा. फाजगे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस अंगद केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष सुनंदा जोगदंड, राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल जिल्हाध्यक्ष विकास वैद्य, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या डॉ. उज्ज्वला सावळे, प्रतीक्षा भगत, ॲड. सोमवारे, प्रताप चौधरी आदी उपस्थित होते. या बैठकीत औरंगाबाद येथे एका दैनिकाच्या कार्यालयावर राणे समर्थकांनी हल्ला केला. या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निषेध करण्यात आला.

Web Title: Communicate the goals of NCP to the common man: Bhosikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.