महाविद्यालये बंद, मात्र परीक्षेसंबंधित कामे करण्याची जबाबदारी खांद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:17 IST2021-04-18T04:17:11+5:302021-04-18T04:17:11+5:30
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक संकुले-प्रशासकीय विभाग, उपपरिसर लातूर व परभणी, न्यू मॉडेल ...

महाविद्यालये बंद, मात्र परीक्षेसंबंधित कामे करण्याची जबाबदारी खांद्यावर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक संकुले-प्रशासकीय विभाग, उपपरिसर लातूर व परभणी, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली, कै.उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट येथील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागाच्या विभागप्रमुखांना विद्यापीठ प्रशासनाने शासन आदेशानुसार १ मेपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. या कालावधीत संलग्न महाविद्यालये बंद राहतील. मात्र, परीक्षासंबंधित कामे महाविद्यालयात येऊन किंवा वर्क फ्रॉम होमनुसार निर्धारित वेळेत करणे आवश्यक राहील, असे म्हटले आहे. कार्यालयात आवश्यक असलेेला कमीत कमी कर्मचारी किंवा क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत कर्मचारी उपस्थित राहून कार्यालये सुरू ठेवता येतील. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबबात निर्णय घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देशही स्वारातीम विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत. विद्यापीठ परिसरातील सर्व इमारतींमध्ये प्रवेश प्रतिबंध करण्यात आल्याचेही विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.