जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:17 IST2021-05-24T04:17:05+5:302021-05-24T04:17:05+5:30
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी या प्रकरणाचा तपास करीत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मेल पाठविणाऱ्याचा शोध घेतला. पोलीस ...

जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा जेरबंद
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी या प्रकरणाचा तपास करीत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मेल पाठविणाऱ्याचा शोध घेतला. पोलीस निरीक्षक चिखलीकर यांनी आपल्या पथकाच्या माध्यमातून विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत संपर्क साधून मेल पाठविणाऱ्या आरोपीची माहिती मिळविली. आरोपी शेख अब्दूल रफिक अब्दूल रऊफ हा अर्धापूर येथील आगापुरा भागातील आहे. त्याला स्थानिक गुन्हा शाखेने उचलले असून, त्याच्याविरुद्ध उपनिरीक्षक आशिष बोराटे यांच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आरोपीकडे एक एजन्सी होती. ती बंद पडल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेख अब्दूल रफिक याने आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेलवर धमकी देण्याचा मार्ग अवलंबिल्याची माहिती पोलीस निरीक्षक चिखलीकर यांनी दिली. त्याच्याबाबत अन्य माहितीही घेतली जात आहे.