आमदार निधीतील १ कोटी रुपये खर्च करण्यास जिल्हाधिकारी यांना मुभा द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:13 IST2021-04-29T04:13:51+5:302021-04-29T04:13:51+5:30
देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन उपलब्ध नसल्यामुळे देगलूर, बिलोली,मुखेड ,नायगाव परिसरातील रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.देगलूर बिलोली परिसरात ...

आमदार निधीतील १ कोटी रुपये खर्च करण्यास जिल्हाधिकारी यांना मुभा द्यावी
देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन उपलब्ध नसल्यामुळे देगलूर, बिलोली,मुखेड ,नायगाव परिसरातील रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.देगलूर बिलोली परिसरात कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढत असून रुग्णांना सिटीस्कॅन करण्यासाठी नांदेड, उदगीर,निजामाबाद व प्रसंगी हैदराबाद येथे जावे लागत आहे.ये जा करण्यात रुग्णाला किमान ६ तास लागत असून त्यात गंभीर रुग्णांचा मृत्यू होत आहे. नुकतेच देगलूर - बिलोली विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूर यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक मतदार संघात आमदारांना आमदार निधीतून कोरोना रुग्णांसाठी १ कोटी रुपये खर्च करण्याची मुभा दिली आहे. परंतु देगलूर - बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचा मृत्यू झाल्यामुळे आमदार निधीतील १ कोटी रुपये देगलुर येथील उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्र खरेदी करण्यासाठी खर्च करण्याची मुभा जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात यावी अशी मागणी जनरल सेक्रेटरी कॉ. प्रा. सदाशिव भुयारे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.