तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:19 IST2021-05-21T04:19:00+5:302021-05-21T04:19:00+5:30
नांदेड शहरात व जिल्ह्यात असणाऱ्या तृतियपंथियांच्या विविवध समस्यांवर चर्चा करण्यात आली. कोष्टकाप्रमाणे आधार कार्ड, रेशन कार्ड व निवडणूक कार्ड ...

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी सरसावले
नांदेड शहरात व जिल्ह्यात असणाऱ्या तृतियपंथियांच्या विविवध समस्यांवर चर्चा करण्यात आली. कोष्टकाप्रमाणे आधार कार्ड, रेशन कार्ड व निवडणूक कार्ड देण्यात यावे, विमा काढण्यात यावा. व्यवसायासाठी किमान दहा लक्ष रूपये बिगरव्याजी कर्ज देण्यात यावे, गोशाळा सुरू करून द्यावी व प्रति गोशाळेस शासनाने शंभर गोमाता अनुदान स्वरूपात देण्यात याव्यात, बचत गट स्थापन करून द्यावेत व शासन नियमानुसार प्रत्येक कार्यालयात कक्षाची अमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, सदर बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई घूगे -ठाकूर, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे,मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नांदेड, सहाय्यक आयुक्त विशेष समाजकल्याण विभाग नांदेडचे तेजस माळवदकर आदींची उपस्थिती होती. त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात बैठक आयोजित केली होती. बैठकीस अवश्यक त्या कागदपत्र, अभिलेखासह उपस्थित राहून कॉ.गंगाधर गायकवाड यांनी समस्या मांडल्या.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी तृतियपंथी यांना कोविड लस घेण्याचे आवाहन केले. पुढील चार दिवसांत हैदर बाग किंवा कौठा येथे लसीकरणाची सोय करणार असल्याचे मनपा उपायुक्त अजितपाल सिंघ संधू यांनी सांगितले. तृतियपंथीयांच्या गुरू तथा ट्रान्सजेंडर जनआंदोलनाच्या उपाध्यक्ष गौरी शानूर बकश यांनी किन्नर भवन बांधून देण्याची मागणी केली. तसा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागा मार्फत पाठविण्यात येईल असे मत समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी मांडले. स्मशानभूमिसाठी जागा तातडीने शोधा अशी सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. बैठकीत ट्रान्सजेंडर महाविकास जनआंदोलनाचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड,उपाध्यक्ष गुरू गौरी शानूर बकश, कार्याध्यक्ष कॉ.मारोती केंद्रे, सचिव कॉ.शेख मगदूम पाशा, कॉ.नरेश जाधव, रेष्मा बकश, शैलजा बकश आणि कमल फौऊंडेशनचे अमरदिप गोधणे आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी पुढील बैठक २ जून २०२१ रोजी घेण्याचे घोषित केले.