शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर कन्या, तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
3
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
4
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
5
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
6
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
7
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
8
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
9
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
10
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
11
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
12
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
13
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
14
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
15
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
16
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
17
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
18
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
19
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
20
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष उमेदवाराच्या प्रचारावरून नांदेड शिंदेसेनेत रणकंदन; संपर्कप्रमुखांच्या समोरच राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:54 IST

शिंदेसेनेच्या आमदारातील अंतर्गत कलह पुढे आला.आमदार पाटील आणि आमदार कल्याणकर या दोघांनीही एकमेकांवर शब्द बाण चालविले.

नांदेड : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदेसेनेतील आमदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्यात युतीच्या विषयावरून बेबनाव सुरू झाला होता. त्यातून नांदेड उत्तरमध्ये शिंदेसेना स्वबळावर, तर दक्षिणमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यासोबत युतीत लढत आहे. त्यांच्यातील अंतर्गत धुसफूस कल्याणकर यांनी डावललेल्या अन् अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या मीनल पाटील यांच्या प्रचारावरून चव्हाट्यावर आली. याच प्रकरणावरून मंगळवारी संपर्कप्रमुख सिद्धराम म्हैत्रे यांच्यासमोर सांगवी प्रभागातील शिवसैनिकांनी राडा केला.

खासदार श्रीकांत शिंदेसमर्थक असलेल्या गजानन पाटील यांच्या पत्नी मीनल पाटील यांना महापालिका निवडणुकीत सांगवी प्रभागातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु, आमदार बालाजी कल्याणकर यांनी ऐनवेळी त्यांचा पत्ता कापून दुसऱ्यालाच उमेदवारी दिली. त्यामुळे मीनल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करून प्रचाराला सुरुवात केली होती. त्यात सोमवारी रात्री आमदार हेमंत पाटील आणि आमदार बाबूराव कदम हे बंडखोर मीनल पाटील यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. विशेष म्हणजे या ठिकाणी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अरूणा कोकाटे या असताना आमदारच अपक्षाचा प्रचार करीत आहेत. त्यावरून शिंदेसेनेच्या आमदारातील अंतर्गत कलह पुढे आला. या विषयावरून आमदार पाटील आणि आमदार कल्याणकर या दोघांनीही एकमेकांवर शब्द बाण चालविले. दरम्यान, मंगळवारी संपर्कप्रमुख सिद्धराम म्हैत्रे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी सांगवी प्रभागातील शिवसैनिकांनी आमदार हेमंत पाटील यांच्याविरोधात घोषणा देत सिद्धराम म्हैत्रे यांच्यासमोरच राडा केला. यावेळी आमदार कल्याणकर यांनी संतप्त कार्यकर्त्यांना समजावत त्यांना शांत केले.

कट्टर शिवसैनिकांच्या मागे उभा गजानन पाटील आणि मीनल पाटील यांनी शासनाचे अनेक उपक्रम राबविले आहेत. तांत्रिकदृष्ट्या त्यांना आम्ही उमेदवारी देऊ शकलो नाही. परंतु, त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांचा प्रचार करीत आहोत. शहरात ज्या ठिकाणी कट्टर शिवसैनिकांवर अन्याय झाला असेल, त्यांच्या मागे मी उभा असल्याचे आमदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच कल्याणकर हे नेते आहेत, मी शिवसैनिक आहे. त्यामुळे माझे ते ऐकतील, अशी माझी अपेक्षा नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

उमेदवारांच्या पाठीशीपाटील यांना उमेदवारीला शिवसेनेचा एबी फॉर्म लागला नाही. ते शिवसेनेचे आहेत. परंतु, आता त्यांना दुसरी निशाणी मिळाली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांच्या पाठीशी आम्ही असल्याचे आमदार बाबूराव कोहळीकर म्हणाले.

झालेली घटना धक्कादायकशिवसेनेचे अधिकृत चार उमेदवार असताना अपक्ष उमेदवाराचा आमच्याच पक्षाचे दोन आमदार प्रचार करीत आहेत, हे पाहून धक्का बसला. या गोष्टी घडू नयेत. पक्षाने जे उमेदवार दिले ते मान्यच करावे लागतील. त्यांना काय बी फाॅर्म मी दिले नाहीत. सचिवांकडून जिल्हाप्रमुखांकडे हे बी फॉर्म येतात. मी काय माझ्या मनाने बी फाॅर्म लिहितो काय? घरात भांडणे असतील तर येऊन बोलावे. मी लहान आहे, ते मोठे आहेत. बाबूराव कोहळीकर यांनीही माझ्या मतदारसंघात येऊन हस्तक्षेप करणे योग्य नाही. उद्या जर मी त्यांच्या हदगाव मतदारसंघात जाऊन लुडबूड केली तर...? असा संताप आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Shinde Sena infighting over independent candidate's campaign sparks chaos.

Web Summary : Infighting erupted in Nanded Shinde Sena over support for an independent candidate. Accusations flew between leaders, leading to protests during a party event. Factions clash publicly.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nanded Waghala Municipal Corporation Electionनांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूक २०२६