शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

नांदेडमध्ये आरोपी अन् पोलिसांमध्ये चकमक; खदानीजवळ फिल्मी स्टाइल गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 19:39 IST

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर गावठी कठ्ठ्यातून गोळीबार

मारतळा (जि. नांदेड) : सिडको भागात एकावर धारदार शस्त्राने हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकांवर आरोपीने गावठी कठ्ठ्यातून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला, तर पोलिसांनीदेखील स्वरक्षणार्थ आरोपीच्या दिशेने पिस्टलमधून दोन फायर केले. यात आरोपीच्या उजव्या पायास गोळी लागली. ही घटना बुधवारी (दि. २६) मध्यरात्रीनंतर २ वाजता झरी (ता. लोहा) येथील खदानीजवळ घडली.

बुधवारी कृष्णासिंग बावरी याच्यावर अविनाश ऊर्फ भय्या माधवराव मिरासे (२८, रा. दत्तनगर, सिडको) याने तलवारीने प्राणघातक हल्ला केला. यात कृष्णा बावरी हा गंभीर जखमी झाला. त्यांनतर आरोपी अविनाश घटनास्थळावरून फरार झाला. तो झरी येथील खदानीजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सोनखेड पोलिस ठाण्याचे सपोनि पांडुरंग माने पथकासह मध्यरात्रीनंतर सदर ठिकाणी गेले.

आरोपीच्या दिशेने दोन राउंड फायरपोलिस पथक दिसताच येथे मद्यपान करीत बसलेला आरोपी अविनाश ऊर्फ भय्या माधवराव मिरासेनी त्याच्याजवळील गावठी कट्ट्यातून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी प्रसंगावधान राखून सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांनी स्वयंसंरक्षणार्थ आरोपीच्या दिशेने दोन राउंड फायर केले. त्यातील एक गोळी आरोपी अविनाशच्या उजव्या पायास लागली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय साईनाथ पुयड यांच्या पथकाने जखमी अविनाश मिरासे याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्याच्यासोबतचा सहकारी मात्र पसार झाला.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक माने यांनी दिली. सदर आरोपी यापूर्वी विरुद्ध शिवाजीनगर, विमानतळ, वजिराबाद, ग्रामीण पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड