शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

आचारसंहिता भंगावर ‘सिटीझन व्हिजिल’ची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:52 AM

निवडणूक काळात होणाऱ्या गैरप्रकारावर आळा घालण्याची जबाबदारी आता प्रशासनासह सामान्य नागरिकालाही पार पाडता येणार आहे. एखाद्या भागात अनुचित प्रकार घडत असल्यास ‘सिटीझन व्हीजील’ च्या माध्यमातून आता थेट निवडणूक आयोगाला सदरील घटनेचे छायाचित्र अथवा व्हीडीओ थेट पाठविता येणार असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देनागरिकांनाही करता येणार आता थेट घटनास्थळावरुन तक्रार, आयोगही घेणार दखल

नांदेड : निवडणूक काळात होणाऱ्या गैरप्रकारावर आळा घालण्याची जबाबदारी आता प्रशासनासह सामान्य नागरिकालाही पार पाडता येणार आहे. एखाद्या भागात अनुचित प्रकार घडत असल्यास ‘सिटीझन व्हीजील’ च्या माध्यमातून आता थेट निवडणूक आयोगाला सदरील घटनेचे छायाचित्र अथवा व्हीडीओ थेट पाठविता येणार असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीची तयारी वेगात सुरु आहे. यासाठी अधिकारी-कर्मचाºयांच्या नियुक्त्या, प्रशिक्षण, बंदोबस्त आढावा आदी कामे प्रशासनाकडून केली जात आहेत. निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाकडूनही याबाबत सूचना दिल्या जात आहेत. त्यातच आता सामान्य नागरिकांनाही मोबाईलच्या माध्यमातून निवडणूक काळात होणाºया गैरप्रकाराची माहिती थेट प्रशासनापर्यंत पोहोचविता येणार आहे.‘सिटीझन व्हीजील’ च्या माध्यमातून प्राप्त होणाºया तक्रारीचे निरसन ११० मिनिटांच्या आत झाले पाहिेजे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यासाठी एका मतदारसंघात चार पथके स्थापन करण्यात आली आहेत. नागरिकाने ‘सिटीझन व्हीजील’ च्या माध्यमातून तक्रार केल्यानंतर ती तक्रार थेट निवडणूक आयोगापर्यंत पोहोचणार आहे. निवडणूक आयोग या तक्रारीची स्थानिक पथकाने काय कारवाई केली याची माहिती घेणार आहे. ही सर्व प्रक्रिया ११० मिनिटात पूर्ण करावयाची आहे. या ‘सिटीझन व्हीजील’ द्वारे येणाºया तक्रारींचे निरसन करण्यासाठी जिल्ह्यात ३६ पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यासह आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी बैठे पथके, भरारी पथकेही कार्यान्वित राहणार आहेत.‘सिटीझन व्हीजील’ माध्यमातून येणारी तक्रार नेमकी कोणत्या भागातील आहे तक्रारीचे छायाचित्र, व्हीडीओ कोणत्या भागातील आहे हे गुगलच्या माध्यमातून निश्चितपणे कळणार आहे. त्यामुळे थेट घटनेपर्यंत प्रशासन पोहचणार आहे. ११० मिनिटांच्या निर्धारीत वेळेत पथक न पोहचल्यास निवडणूक आयोग त्याची दखल घेणार आहे. त्यामुळे वेळेत कारवाई करणे गरजेचे आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून काही चुकीच्या तक्रारी आल्यास त्यावरही कारवाई निश्चितपणे होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ‘सिटीझन व्हीजील’ या अ‍ॅपच्या माध्यमातून निवडणूक काळात होणाºया गैरप्रकारावर निश्चितपणे आळा बसेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व्यक्त केला आहे.मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक आता थेट केंद्रावरचलोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणा-या ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट यंत्राची चाचणी आता थेट मतदान केंद्रावरच करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यापूर्वी इलेक्ट्रॉनिक वोटींंग मशिन असताना या मशिनचे प्रात्यक्षिक मतदान केंद्रात नेण्यापूर्वी केले जायचे. आता हे प्रात्यक्षिक बंद करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच देशभरात व्हीव्ही पॅट यंत्र वापरले जात आहे. या यंत्राच्या वापरामुळे सदरील प्रात्यक्षिक आता थेट मतदान केंद्रावरच करावे असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड