शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

गाव पाणीदार करण्यासाठी लोहा तालुक्यातील ६८ गावांतील नागरिक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:58 AM

गाव पाणीदार करून पाणी फाऊंडेशनचे बक्षीस मिळविण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून सकाळी व सायंकाळच्या वेळी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला, अपंग व अबालवृद्ध सहभागी झाल्याचे चित्र तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कलोहा : ‘सत्यमेव जयते’ प्रस्तुत पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप २०१८ च्या माध्यमातून गाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने लोहा तालुक्यातील काही गावांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले़ प्रारंभी चार-पाच नागरिकांच्या श्रमदानातून सुरू झालेली कामे आजघडीला पाहता पाहता शेकडोंच्या सहभागाने कामे सुरू झाली़ गाव पाणीदार करून पाणी फाऊंडेशनचे बक्षीस मिळविण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून सकाळी व सायंकाळच्या वेळी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला, अपंग व अबालवृद्ध सहभागी झाल्याचे चित्र तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे़मागील चार महिन्यांपासून पाणी फाऊंडेशनचे सुगंध पळशे, इंद्रजित पाटील यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जावून ग्रामस्थांच्या बैठका घेऊन पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कर स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले़ त्यामध्ये तालुक्यातील ६८ गावांनी सहभाग घेतला़ ती अशी -दापशेड, टेळकी, दगडगाव, कलंबर खु़, पांगरी, वडेपुरी, खडकमांजरी, शेलगाव, पारडी, सुनेगाव, मारतळा, बोरगाव आ़, आष्टुर, कापशी बु़, पिंपळदरी, धनज बु़, सुगावा, उंबरा, कलंबर बु़, गुंडेवाडी, डोणवाडा, चितळी, मंगरूळ, पोलीसवाडी, हिप्परगा, निळा, मडकेवाडी, जोशी सांगवी, भाद्रा, घुगेवाडी, धनज बु़, वाळकी खु़, बोरगाव को़, हिंदोळा, वडगाव, हरबळ, काबेगाव, जवळा दे़, आडगाव, पळशी, रायवाडी, पिंपळगाव ध़, खेडकरवाडी, पोखरी, कांजाळा, सायाळ, पिंपळगाव म़, रिसनगाव, धानोरा शे़, वाका, सोनखेड, पेनूर, लांडगेवाडी, गोळेगाव, भेंडेगाव, माळेगाव, हिराबोरी तांडा, माळाकोळी, लव्हराळ, मुरंंबी, मस्की, धानोरा म़, हरसद, पोखरभोसी, लोंढेसांगवी, किवळा, दगडसांगवी व बामणी आदींचा समावेश आहे़नागरिक लोकसहभागातून करताहेत श्रमदानसदरील ६८ गावांतील नागरिक लोकसहभागातून श्रमदान करत आहेत़ यामध्ये पुरुष, महिला, अपंग, वृद्ध व चिमुकलेही सहभागी होवून श्रमदान करत आहेत़ याला जोड म्हणून मग्रारोहयोची मदत घेण्यात येत आहे़ माती आडवा पाणी जिरवा ही भूमिका घेवून शोषखड्डे, शेततळे, नाला बंडींग, एलबीसी, सीसीटी आदी कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत़८ एप्रिल रोजी तालुक्यातील वडेपुरी येथील माता रत्नेश्वरी देवीचे दर्शन घेवून रात्री १२ वाजता आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर, जि़प़सदस्या प्रणिता चिखलीकर यांच्या हस्ते पाणी फाऊंडेशनच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला़ त्याचवेळी इतर २२ गावांनी देखील प्रारंभ केला़ माथा ते पायथा पाणी साठवून रहावे हा उद्देश असून जल, जमीन व जंगल संवर्धनासाठी वॉटर कप मोलाचे ठरून आगामी काळात दुष्काळ कायमचा हटणार असल्यामुळे नागरिक जोमाने कामाला लागले आहेत़ याला जोड म्हणून डॉक्टर मंडळी, जैन संघटना मदतीसाठी पुढे आली आहे़कृषी अधिकारी विश्वंभर मंगनाळे यांनी योजनेतील पुरस्काराच्या रकमेतून श्रमदान करणाऱ्यांना टोपली, फावडे, खोरे दिल्याने त्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले़ रायवाडीचे अनिल ऊर्फ एकनाथ मोरे स्वत:हून श्रमदान करत असून वॉटर कप स्पर्धा निमित्तमात्र आहे़ तर गाव पाणीदार करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले़

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाNandedनांदेड