शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या पदाधिकाऱ्यांत सिनेस्टाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:34 IST

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतरही नांदेड भाजपातील अंतर्गत लाथाळ्या उफाळून आल्याचे पहावयास मिळत आहे़ यापूर्वी खा़ प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर यांच्यामध्ये मोठा कोण? यावरुन चांगलीच जुंपली होती़

ठळक मुद्देलग्नात झाली होती भेट जुन्या पदाधिका-याचा विषय वादास कारणीभूत

नांदेड : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतरही नांदेडभाजपातील अंतर्गत लाथाळ्या उफाळून आल्याचे पहावयास मिळत आहे़ यापूर्वी खा़ प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर यांच्यामध्ये मोठा कोण? यावरुन चांगलीच जुंपली होती़ त्यात आता दुस-या फळीतील कार्यकर्त्यांनीही उडी घेतली आहे़ गुरुवारी रात्री मातोश्री मंगल कार्यालय परिसरात जुन्या पदाधिका-याच्या विषयावरुन भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाली़लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर विजयी झाले़ परंतु प्रचाराच्या काळात भाजपाच्याच काही निष्ठावंतांनी चिखलीकर यांच्या विरोधात काम केले़ विजयानंतर चिखलीकर यांनी झारीतील अशा शुक्राचार्यांना खड्यासारखे बाजूला करण्यास सुरुवात केली आहे़ त्यावरुन आयात आणि निष्ठावंत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती़ माजी खाख़तगावकर यांनी तर थेट प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता़ त्यावरुन भाजपात उघडपणे दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले़असे असताना आता दुसºया फळीतील पदाधिकारीही एकमेकांवर धावून जात आहेत़ गुरुवारी रात्री मातोश्री मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दिलीपसिंग सोढी आणि माजी विरोधी पक्षनेता बाळू खोमणे हे एकत्र आले होते़सोहळ्यादरम्यान दोघांमध्ये चांगली चर्चाही झाली़ सोहळा आटोपून बाहेर पडत असताना मात्र भाजपाच्याच एका जुन्या पदाधिका-याचा विषय निघाला़ या पदाधिका-याच्या विषयावरुन मात्र दोघांमध्ये चांगलीच हमरी-तुमरी झाली़हा वाद एवढा विकोपाला गेला की, दोघांनीही बाह्या वर करीत हाणामारीस सुरुवात केली़ काही मिनिटे दोघांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी सुरु होती़ लग्नसोहळ्यासाठी जमलेल्या काही जणांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविला़ त्यानंतर रात्रीच दोघांनी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेतले़ दरम्यान, सायंकाळपर्यंत या प्रकरणात कुणीही ठाण्यापर्यंत गेले नव्हते़ परंतु दुस-या फळीतील पदाधिकारी आता मुद्यावरुन गुद्यावर आल्याचे दिसून येते़जुन्या अन् नव्या पदाधिका-यांमध्ये संघर्षलोकसभा निवडणुकीनंतर भाजपातील जुन्या अन् नव्या पदाधिका-यांतील संघर्ष आणखी तीव्रपणे समोर येत आहे़ जुन्या पदाधिका-यांना डावलले जात असल्याबाबत चर्चाही सुरु आहे़ परंतु आता शिस्तीचा पक्ष असलेल्या भाजपातही पदाधिकारी मुद्यावरुन गुद्यावर येत आहेत़ त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे़

टॅग्स :NandedनांदेडBJPभाजपाmarriageलग्न