हरित नांदेड अभियानांतर्गत सिडकोत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST2020-12-29T04:15:53+5:302020-12-29T04:15:53+5:30

हरित नांदेड अभियान अंतर्गत वृक्षमित्र फाउंडेशन व महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सिडको येथील माता ...

Cidcot tree planting under Green Nanded Campaign | हरित नांदेड अभियानांतर्गत सिडकोत वृक्षारोपण

हरित नांदेड अभियानांतर्गत सिडकोत वृक्षारोपण

हरित नांदेड अभियान अंतर्गत वृक्षमित्र फाउंडेशन व महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सिडको येथील माता कन्यका भवन मंगल कार्यालय परिसरात आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, उपाध्यक्ष सुभाष कन्नावार, सचिव गोविंद बिडवई, तसेच दिलीपभाऊ कंदकुर्ते, डॉ. डी.आर. मुखेडकर, अनिल मनाठकर, ज्ञानेश्वर महाजन, सुधाकर वट्टमवार, डॉ. किरण चिद्रावार, पांडुरंग बच्चेवार, डॉ. नरेश रायेवार, विजय बंडेवार, गणेश गादेवार यांच्या शुभहस्ते वृक्ष लागवड करून या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी याप्रसंगी महासभा लोकचळवळीस सहकार्य करेल व पर्यावरण संवर्धनात भविष्यात ही पुढाकार घेईल, असा विश्वास दिला.

या वृक्षलागवड कार्यक्रमात ३१ निसर्गपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात वृक्षमित्र फाउंडेशनचे कैलास अमिलकंठवार, गणेश साखरे, प्रितम भराडीया, प्रल्हाद घोरबांड, लक्ष्मण गज्जेवार, माणिक अन्नपूर्णे, सचिन जोड, प्रदीप मोरलवार, मंगेश महाजन, प्रताप खरात, प्रशांत रत्नपारखी, मनोज गुंजावळे, लोभाजी बिरादार, गौरांग देशटवार, दत्ता पावडे, राजेश्वर कमटलवार, सुरेश कोटगिरे, प्रभाकर महाजन, श्रीनिवास कोटगिरे, अरूणपाल ठाकूर या सर्व वृक्षमित्रांनी वृक्षलागवड केली.

Web Title: Cidcot tree planting under Green Nanded Campaign