शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांना हक्काचा निवारा मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:58 IST

वाड्या-वस्त्यांवरील चिमुकल्यांना सकस पोषण आहाराबरोबरच शिक्षणाची सुविधा देण्यासाठी महिला व बालकल्याण एकात्मिक महिला विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्या चालविण्यात येत आहेत

ठळक मुद्देसुविधांचा अभाव जिल्ह्याभरात ९१६ अंगणवाड्या भरतात उघड्यावरच

नांदेड : वाड्या-वस्त्यांवरील चिमुकल्यांना सकस पोषण आहाराबरोबरच शिक्षणाची सुविधा देण्यासाठी महिला व बालकल्याण एकात्मिक महिला विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्या चालविण्यात येत आहेत. मात्र यातील ७१६ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याने या चिमुकल्यांना हक्काचा निवारा मिळणार कधी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.आर्थिक दुर्बल घटकातील पालकांसाठी त्यांच्या मुलांच्या दृष्टिकोणातून अंगणवाड्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या अंगणवाड्यामुळेच या चिमुकल्यांना बालवयात शिक्षणाचे धडे गिरविण्याची संधी मिळते. मात्र अंगणवाड्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांकडे प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ४ हजार १६० अंगणवाड्यांची नोंद आहे. यातील ३ हजार ७७९ अंगणवाड्या मोठ्या तर ७६६ अंगणवाड्यांकडे मिनी अंगणवाड्या म्हणून पाहिले जाते. मात्र जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती नसल्याने काही अंगणवाड्या गावातील चावडी, काही मंदिर अथवा समाजमंदिरात तर काही अन्य ठिकाणी सोयीनुसार भरविण्यात येतात. सध्या तापमानाचा पारा चढता आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम अंगणवाड्यावरही जाणवू लागला असून प्रशासनाने अंगणवाड्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.मागणी करूनही इमारतींसाठी निधी नाहीजिल्ह्यातील ४ हजार १६० अंगणवाड्यांपैकी १३८४ अंगणवाड्या या नगरविकास विभागाद्वारे चालविण्यात येतात. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ९४ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती असल्या तरी ७१६ अंगणवाड्यांना अद्यापही इमारतींची प्रतीक्षा आहे. याबाबतचे प्रस्ताव गावस्तरावरुन प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही इमारतीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडHomeघरSocialसामाजिक