शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीकर म्हणाले, अशोकरावच नेते, खतगावकरांनी सभेत घेतले वदवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 08:01 IST

भर सभेत त्यांनी चिखलीकरांना उठवून अशोकरावांचे नेतृत्व मान्य करायला लावले. 

नांदेड :  माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि खासदार प्रतापराव चिखलीकर यांचे अलीकडच्या महिनाभरापूर्वी पर्यंत विळ्या-भोपळ्याचे संबंध होते. त्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाने आगीत तेल ओतण्याचेच काम केले. परंतु चव्हाणांनी हाती कमळ धरताच या दोन्ही नेत्यांची दिलजमाई झाली. परंतु जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व कोण करणार अशी कुजबुज कार्यकर्त्यांत होती. त्यावर माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या कृतीने शनिवारी पडदा पडला. भर सभेत त्यांनी चिखलीकरांना उठवून अशोकरावांचे नेतृत्व मान्य करायला लावले. 

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा देत भाजप प्रवेशाचा सपाटाच लावला. त्यांच्या पाठाेपाठ भास्करराव खतगावकर आणि मीनल खतगावकर हे भाजपवासी झाले. चव्हाणांच्या शिफारशीवरून मीनल खतगावकर यांनी लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंगही लावली होती. त्यामुळे चिखलीकर समर्थक अस्वस्थ झाले होते. त्यात भाजपाने चिखलीकरांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे दादा मात्र नाराज झाल्याची चर्चा होती.

एका नेत्याच्या वाढदिवसाचे निमित्त करून चव्हाणांनी दादांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चाही केली. त्यानंतर विशेष विमानाने चव्हाण, खतगावकर, चिखलीकर हे लगोलग मुंबईला गेले. या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दादांची नाराजी दूर झाली.

दोन्ही खासदार पडले बुचकळ्यात बैठकीत भाजपचे सर्व आमदारही उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरून बोलताना खतगावकर यांनी प्रतापराव तुम्हाला उठून सांगायचे आहे की तुम्हाला अशोकरावांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. लोकांना आश्वासन द्या की इथून पुढे तुमच्यात आणि अशोकरावांमध्ये वाद होणार नाही, असे आवाहन केले. त्यांच्या या वाक्याने व्यासपीठावरील अशोकराव चव्हाण आणि चिखलीकर हेही काही क्षणासाठी बुचकाळ्यात पडले. परंतु खतगावकर यांनी पुन्हा चिखलीकरांकडे पाहत उठून सांगा, असे म्हणताच चिखलीकर ध्वनिक्षेपकाकडे गेले. यावेळी चिखलीकर म्हणाले, अशोकराव हे मोठे नेते आहेत. यापुढेही त्यांच्या नेतृत्वात काम करेल असे स्पष्ट केले. त्यांच्या वक्तव्याने दादांचे समाधान झाल्यानंतर दादांनी भाषण सुरू केले.

टॅग्स :Nandedनांदेडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४