शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

मुख्यमंत्र्यांचा फोडाफोडीचा उद्योग लोकशाहीसाठी मारक : अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 15:02 IST

भाजपाच्या साम-दाम-दंड-भेद नीतीचा निषेध

ठळक मुद्देसुजय विखेंचा भाजप प्रवेश दुर्देवीवंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेचे दरवाजे खुले

नांदेड : सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी भाजपामध्ये केलेला प्रवेश दुर्दैवी असल्याचे सांगत भाजपाच्या साम-दाम-दंड-भेद नीतीचा मी निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोडाफोडीचा हा उद्योग लोकशाहीला मारक असल्याचे चव्हाण म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले, युती सरकारचा पाच वर्र्षांचा कारभार  सर्वच दृष्टीने अपयशी ठरला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची परिस्थिती महाराष्ट्रात मजबूत आहे.  त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत ही आघाडी शिवसेना-भाजपा युतीपेक्षा अधिक जागा मिळवेल.  अझहर मसूद हा अतिरेकी आहे. त्याच्याबद्दल राहुल गांधी यांना वेगळी भावना असण्याचे कोणतेही कारण नाही. काँग्रेस पक्ष मागील अनेक वर्षांपासून  दहशतवादाचा सामना करतो आहे. काँग्रेस नेते तथा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा मृत्यूही दहशतवाद्यामुळेच झाला आहे. त्यामुळे एखादा शब्द चुकीचा गेला म्हणून राहुल यांच्या वक्तव्याचा बाऊ करुन राजकारण करणे चुकीचे आहे.  नागपूर येथील नाना पटोले यांच्या उमेदवारीवर चव्हाण म्हणाले, पटोले यांची उमेदवारी पक्षाने अद्यापही जाहीर केलेली नाही.

चर्चेचे दरवाजे खुलेवंचित बहुजन आघाडीने २२ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. हे उमेदवार जाहीर केल्यानंतर जागा शिल्लक राहतात किती? लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करायचा असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे.  याच भूमिकेतून वंचित आघाडीसह इतर समविचारी पक्षांसाठी चर्चेचे दरवाजे अद्यापही खुले असल्याचे सांगत आता समोरच्या पक्षाने या दरवाजातून आत यायचे की ते बंद करायचे, याचा निर्णय घ्यावा, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा