रासायनिक खते महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:18 IST2021-05-18T04:18:42+5:302021-05-18T04:18:42+5:30
खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्जावर अवलंबून असतो. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने शेतकऱ्यांना पीक ...

रासायनिक खते महागली
खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्जावर अवलंबून असतो. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेच्या दारात जावे लागते. त्या ठिकाणी शेती गहाण ठेवून मिळणारे कर्ज बँक व्यवस्थापन उपकार केल्यासारखे देतात. तर वशिला नसलेल्यांना बँकेत कर्जही मिळत नाही. त्यांना खासगी सावकारांच्या सवाई व दुपटीच्या व्याजाला बळी पडावे लागते. शिवाय नैसर्गिक संकटाचा फटका पिकांना बसत असतो. येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार, त्यातच आता रासायनिक खताची दरवाढ झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
अशी आहे रासायनिक खतांची दरवाढ...
१५-१५-१५ जुने दर १०६० नवीन दर १४००
१०-२६-२६ जुने दर ११७६ नवीन दर १७७५
२०-२०-० जुने दर ९७५ नवीन दर १३५०
१६-१६-१६ जुने दर १०७५ नवीन दर १३५०
१२-३२-१६ जुने दर ११८५ नवीन दर १९००
पोटॅश जुने दर ८५० नवीन दर १०००
याचप्रकारे इतरही रासायनिक खतांच्या वानात प्रचंड वाढ झाली आहे.