१४ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:16 IST2021-04-19T04:16:17+5:302021-04-19T04:16:17+5:30

वजिराबाद पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर अटक केलेले सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. शंकर नागरी बँकेचे खाते आयडीबीआय बँकेत आहे. ...

Chargesheet filed against accused in Rs 14 crore scam | १४ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल

१४ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल

वजिराबाद पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर अटक केलेले सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. शंकर नागरी बँकेचे खाते आयडीबीआय बँकेत आहे. डिसेंबरमध्ये त्यांना समजलेल्या माहितीनुसार त्यांच्या खात्यातील १४ कोटी ४३ लाख ५ हजार ३४७ रुपयांची फसवणूक करून २७९ खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आले. याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यानंतर पोलिसांनी १७ आरोपींना अटक केली असून यामध्ये नांदेड जिल्ह्यासह इतर राज्यांतील आरोपींचा समावेश आहे. तुरुंगात असलेल्या आरोपींचे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठीची मुदत १७ एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी पूर्ण केली; परंतु त्यानंतर त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाल्यानंतर जगदीश भंडरवार हे पोलीस निरीक्षक म्हणून वजिराबाद ठाण्यात रुजू झाले. त्यानंतरही पोलीस निरीक्षक संदीप शिवले, पोलीस उपनिरीक्षक सुभान केंद्रे आणि अनेक पोलीस अंमलदार आणि या गुन्ह्यातील सर्व कागदपत्रे तयार करून विहित मुदतीत म्हणजे १६ एप्रिल रोजी १५ आरोपींविरुद्ध न्यायालयात १ हजार ७१५ पानी दोषारोपपत्र सादर केले.

गुन्हे दाख झालेल्या आरोपींमध्ये देशातील श्रुती धनंजय देवदत्ता, दीक्षा मिलिंद पाटील, चांद बाबू मोहम्मद रियाज, नमित संजय पटवा, शरीफ मोहम्मद, विमलादेवी सुरेंद्रसिंह चौधरी, प्रिया प्रवीण माळवदे, मयंक मनोहरलाल शर्मा, चंदन प्रेमचंद रॉय आणि विकास सुरेंद्रकुमार सेन या भारतीय नागरिकांचा समावेश आहे. तर विदेशी नागरिकांमध्ये सरकाराला सेमी शो, सिडनी रुमानी, रोनॉल्ड बाबा, रॉबर्ड फ्रेड, आयबी आणि इमरान सोयब उस्मान सोयब यांचा समावेश आहे.

Web Title: Chargesheet filed against accused in Rs 14 crore scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.