विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:12 IST2020-12-07T04:12:41+5:302020-12-07T04:12:41+5:30

भोकर : विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करून कारसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई ...

Charges filed against four persons for smuggling foreign liquor | विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

भोकर : विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करून कारसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई भोकर पोलिसांनी शनिवारी रात्री केली आहे.

यातील आरोपी रामचंद्र बहुमन्ना दात्रिका, नवीनकुमार नरसया अलाडी, विलास किशन करपे (तिघे रा. जाम, ता. जि. निर्मल) आणि तेजूनायक हरियानायक (रा. कोटाला, ता, सारंगपूर, जि. निर्मल) हे ४ जण आपल्या ताब्यातील लाल रंगाच्या सेन्ट्रो झिंग कार (एपी- ०१ एसी- ७२९६) मधून ब्लेक डीलक्स व्हिस्की दारूच्या ४१ बॉटल विनापरवाना तेलंगणा राज्यात घेऊन जाताना गस्तीवरील पोलिसांनी त्यांना शहरातील डॉ. आंबेडकर चौक येथे ताब्यात घेतले. यात १९ हजार ४० रुपये किमतीची विदेशी दारू व ४ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ४ लाख १९ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींसह ताब्यात घेतला. सपोनि. अनिल कांबळे यांच्या फिर्यादीवरून यातील आरोपींविरुद्ध कलम ६५ इ ८३ म. प्रो. ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पो.नि. विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका. रंगराव राठोड तपास करीत आहेत.

Web Title: Charges filed against four persons for smuggling foreign liquor