शहिदी दिनानिमित्त वाहेगुरु मंत्र जाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST2020-12-29T04:15:47+5:302020-12-29T04:15:47+5:30
नांदेड : तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे गुरु साहिब यांचे चार साहिबजादे आणि माता गुजरीजी यांच्या शहिदी दिनानिमित्त ...

शहिदी दिनानिमित्त वाहेगुरु मंत्र जाप
नांदेड : तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे गुरु साहिब यांचे चार साहिबजादे आणि माता गुजरीजी यांच्या शहिदी दिनानिमित्त सोमवारी वाहेगुुरु मंत्र जाप कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
दशमेश पिता साहिब श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांचे चार साहिबजादे व माता गुजरीजी यांनी धर्मरक्षण व मानवतेसाठी आपले बलिदान दिले होते. त्यांच्या या शहिदी दिनानिमित्त सोमवारी सकाळी पावणे अकरा ते अकरा वाजेपर्यंत तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे पंज प्यारे साहिबान यांच्या उपस्थितीत गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्यावतीने वाहेगुरु मंत्र जाप करण्यात आला.यावेळी मंत्र जापनंतर अरदास करण्यात आली.
यावेळी मानयोग जत्थेदार सिंघ साहिब बाबा कुलवंतसिंघजी, मीत जत्थेदार सिंघ साहिब भाई जोतिंदरसिंघजी, हैड ग्रंथी भाई कश्मीरसिंघजी, सिंघ साहिब भाई रामसिंघजी धुपिया, गुरुमितसिंघजी पुजारी, संत बाबा नरिंदरसिंघजी, संत बाबा बलविंदरसिंघजी, परमवीरसिंघजी रहरासिया, सचिव रवींद्रसिंग बुंगई, अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा, रणजितसिंघ चिरागिया, भागिंदरसिंघ घडीसाज उपस्थित होते.