शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

एटीएम कार्ड बदलत शेतकऱ्याच्या खात्यावरील ४० हजार चोरले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 20:38 IST

शहरातील वामननगर येथील एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पासवर्ड चोरुन बघितल्यानंतर कार्ड अडकत असल्याचा बहाणा करीत चलाखीने एटीएमची अदलाबदल केली़ त्यानंतर शेतकरी कैलास वानखेडे यांच्या आईच्या खात्यातील ४० हजार रुपये लंपास केले

नांदेड : शहरातील वामननगर येथील एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पासवर्ड चोरुन बघितल्यानंतर कार्ड अडकत असल्याचा बहाणा करीत चलाखीने एटीएमची अदलाबदल केली़ त्यानंतर शेतकरी कैलास वानखेडे यांच्या आईच्या खात्यातील ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना ९ एप्रिल रोजी घडली़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ 

नंदनवन कॉलनी येथील कैलास वानखेडे हे आपल्या आईच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी त्यांचे एटीएम घेऊन वामननगर येथील एटीएम केंद्रावर गेले होते़ यावेळी पहिल्यांदा वानखेडे यांनी एटीएम मशीनमध्ये एटीएम टाकले अन् पासवर्डही टाकला़ परंतु व्यवहार झालाच नाही़ त्याचवेळी वानखेडे यांच्या पाठीमागे असलेल्या अज्ञात व्यक्तीने चोरुन वानखेडे यांनी टाकलेला पासवर्ड पाहिला होता़ 

वानखेडे यांनी दुसऱ्या वेळेस एटीएम मशीनमध्ये एटीएम टाकले़ परंतु ते अडकले़ यावेळी त्यांच्या पाठीमागील व्यक्तीने एटीएम अडकत असून तुम्हाला मदत करतो असे सांगून एटीएमची अदलाबदल केली़ त्यानंतरही पैसे न निघाल्याने वानखेडे हे घरी परतले़ थोड्याच वेळात आरोपीने कैलासनगर व साठे चौक अशा दोन ठिकाणांहून वानखेडे यांच्या आईच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून घेतले़ पैसे खात्यातून कपात झाल्याचा संदेश वानखेडे यांना त्यांच्या मोबाईलवर आल्यानंतर त्यांनी थेट भाग्यनगर पोलीस ठाणे गाठले़ या ठिकाणी वानखेडे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास पोउपनि ढेमकेवाड हे करीत आहेत़ 

सीसीटीव्ही फुटेजची तपासणीवामननगर येथील एटीएम केंद्रातून वानखेडे यांचे एटीएम चोरीला गेले होते़ त्यानंतर आरोपीने कैलासनगर व अण्णा भाऊ साठे चौक येथील एटीएममधून रक्कम काढली़ त्यामुळे या तिन्ही ठिकाणच्या   सीसीटीव्ही फुटेजची भाग्यनगर पोलिसांकडून तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले़ 

एटीएम वापरताना ही काळजी घ्याआॅनलाईन बँकिंगमुळे एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ परंतु, निष्काळजीपणामुळे आपली फसवणूक होऊ शकते़ त्यासाठी आपल्या एटीएमचा १६ अंकी क्रमांक, पाठीमागील बाजूचा ३ अंकी क्रमांक आणि पासवर्ड नेहमी गोपनीय ठेवावा़ तो कोणालाही सांगू नये, फोनवर एटीएमबाबत कोणतीच माहिती देऊ नये़ पेट्रोलपंप, शॉपिंग मॉल इ. ठिकाणी कार्ड स्वाईप करताना पासवर्ड स्वत: टाकावा तो दुकानदार अथवा पेट्रोल पंपावरील मुलांना सांगू नये़ आॅनलाईन पेमेंट करताना नेट कॅफे अथवा सार्वजनिक ठिकाणी मोफत मिळणाऱ्या इंटरनेटचा वापर करू नये़  - धनंजय पेनूरकर, शाखा व्यवस्थापक, अ‍ॅक्सिस बँक, भावसार चौक, नांदेड 

टॅग्स :atmएटीएमtheftचोरीMONEYपैसाNanded policeनांदेड पोलीस