अशोक चव्हाण सेवासेतूच्या दूरध्वनी क्रमांकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:14 IST2021-06-28T04:14:09+5:302021-06-28T04:14:09+5:30

या कॉलसेंटरचा नवीन क्रमांक ०२४६२-२६९००३ असा असेल. हा क्रमांक कार्यान्वित झाला असून, सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते सायंकाळी ...

Change in telephone number of Ashok Chavan Sevasetu | अशोक चव्हाण सेवासेतूच्या दूरध्वनी क्रमांकात बदल

अशोक चव्हाण सेवासेतूच्या दूरध्वनी क्रमांकात बदल

या कॉलसेंटरचा नवीन क्रमांक ०२४६२-२६९००३ असा असेल. हा क्रमांक कार्यान्वित झाला असून, सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांना शासकीय कामकाजाबाबत आपल्या समस्या नोंदवता येतील. रविवार व सुटीच्या दिवशी हे कॉलसेंटर बंद असेल. प्रायोगिक स्तरावर ही सुविधा सध्या भोकर विधानसभा मतदारसंघासाठी सुरू आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून यंदा २६ जानेवारी रोजी या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती; परंतु त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत टाळेबंदी व शासनाचे निर्बंध लागू झाल्यामुळे या खासगी कॉलसेंटरची सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. आता निर्बंध शिथिल झाल्याने खबरदारीचे उपाय पाळून ‘अशोक चव्हाण सेवासेतू’ पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Change in telephone number of Ashok Chavan Sevasetu