शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सवयी बदला, आयुष्य बदलेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:05 IST

आजच्या बदलत्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात स्थुलता , मधुमेहामुळे ह्दयविकाराचे प्रमाण वाढत आहे़ सरळ, सोपा उपाय म्हणजे विनासायास वजन कमी करणे हा जीवनशैलीचा विकास आहे.

ठळक मुद्देजगन्नाथ दीक्षित मातोश्री भीमाई व्याख्यानमाला

मुखेड : आजच्या बदलत्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात स्थुलता , मधुमेहामुळे ह्दयविकाराचे प्रमाण वाढत आहे़ सरळ, सोपा उपाय म्हणजे विनासायास वजन कमी करणे हा जीवनशैलीचा विकास आहे. वजन कमी करण्यासाठी स्वत:चे प्रयत्न गरजेचे आहेत. निश्चय हवा व तीन महिन्यांत याचा लाभ होतो़ यासाठी अनावश्यक सवयी बदल्यास आयुष्य बदलेल, असे प्रतिपादन स्थुलता निवारण अभियानाचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी येथे केले़‘विनासायास वेट लॉस व मधुमेह प्रतिबंध’ या विषयावर मातोश्री भीमाई व्याख्यानमालेत आठवे पुष्प गुंफताना ते बोलत होते़अध्यक्षस्थानी भाई श्रीराम गरुडकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. कर्मवीर किशनराव राठोड, नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, तहसीलदार अतुल जटाळे, डॉ.दिलीप पुंडे, मालाताई पुंडे, जय जोशी, डॉ.मनीषा जोशी यांची उपस्थिती होती. डॉ़ दीक्षित म्हणाले, दिवसातून दोन वेळा जेवण करणे आवश्यक आहे. ५५ मिनिटांत जेवण करणे उपयुक्त आहे.गरज भासल्यास नारळ पाणी, ताक घ्यावे. दररोज ४५ मिनिटे चालावे. या आहार प्रणालीस त्यांनी धर्माची जोड देत तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर जैन यांचे उदाहरण दिले. सर्व समाज स्थुलतामुक्त करण्यासाठी जेवणात अतिआग्रह व अन्न वाया जाते म्हणून सर्वच खाणे हे अत्यंत घातक आहे़ यावेळी जय जोशी व डॉ. मनीषा जोशी यांचा सत्कार करण्यात आला़प्रास्ताविकात डॉ.दिलीप पुंडे म्हणाले, मागील सात वर्षांपासून अविरत व्याख्यानमाला सुरु आहे. आठवे पुष्प गुंफताना व्याख्यानमालेचा हा चढता आलेख आहे. मुखेडवासियांची वैचारिक भूक मोठी आहे. श्रोते या व्याख्यानमालेचे खरे वारकरी आहेत. तरुणांचे अकाली मृत्यू, प्रत्येक उंबरठ्यावर मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकार व कॅन्सर आहे़ याचा जनतेला लाभ व्हावा म्हणून या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. वीरभद्र मठपती यांच्या वंदे मातरम् गीतगायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली़संचालन शिवाजी आंबुलगेकर यांनी केले. शिवराज साधू यांनी आभार मानले. मानपत्रवाचन प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांनी केले. यशस्वीतेसाठी सुप्रभात मित्रमंडळ, वैद्यकीय संस्था, अनिल कोत्तावार, रमेश मेगदे, अरविंद चिटमलवार, बालाजी इंगोले, बालाजी डोणगाये, व्यंकट शिंदे, शंकर चव्हाण, भास्कर इंगोले, किरण कदम, संदीप गोपछडे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Nandedनांदेडfoodअन्न