नांदेडमध्ये उभारणार कौशल्य विकासाधारित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:19 IST2021-02-11T04:19:55+5:302021-02-11T04:19:55+5:30

नांदेडमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करणे, आर्थिक मागास विद्यार्थी व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणे यासंदर्भात चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व ...

Center of Excellence to be set up in Nanded | नांदेडमध्ये उभारणार कौशल्य विकासाधारित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

नांदेडमध्ये उभारणार कौशल्य विकासाधारित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

नांदेडमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करणे, आर्थिक मागास विद्यार्थी व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणे यासंदर्भात चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या सचिव अन्शू सिन्हा, कौशल्य विकास आयुक्त दीपक कुशवाह आदी यावेळी उपस्थित होते.

मलिक म्हणाले की, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी, तसेच कौशल्याधारित व्यवसायासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती करण्यात येणार आहे. नांदेडमध्ये हे केंद्र सुरू झाल्यामुळे तेथील युवकांना चांगले प्रशिक्षण मिळणार आहे. या केंद्रासाठी २० एकर जागेची आवश्यकता आहे. यासाठी तसेच सेंटर उभारण्यासाठी आवश्यक बाबींचा प्रस्ताव सादर करावा.

वसतिगृहासाठी जागेचा प्रस्ताव पाठवावा

आर्थिक मागास घटकातील विद्यार्थी, तसेच अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्था व पॉलिटेक्निक कॉलेजमागील जागा द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी यावेळी केली. वसतिगृह उभारण्यास मान्यता देऊन यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश कौशल्य विकासमंत्री मलिक यांनी यावेळी दिले.

जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्था व पॉलिटेक्निक कॉलेज यांच्यामध्ये दोन्ही विभागांची जागा उपलब्ध आहे. या जागेवर सुमारे दोनशे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याचे नियोजन आहे. ही जागा देण्यासाठी कौशल्य विकास विभागाची मंजुरी मिळावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली, तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात वसतिगृह उभारण्यासंदर्भातही प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश मलिक यांनी यावेळी दिले.

Web Title: Center of Excellence to be set up in Nanded