राष्ट्रीय गणित दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST2020-12-29T04:15:42+5:302020-12-29T04:15:42+5:30

नांदेड- गोकुळनगर भागातील अंतर्गत रस्त्याचे सिमेंट क्राँकिटीकरण करण्यात काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या रस्त्याचे काम संथगतीने ...

Celebrate National Mathematics Day | राष्ट्रीय गणित दिवस साजरा

राष्ट्रीय गणित दिवस साजरा

नांदेड- गोकुळनगर भागातील अंतर्गत रस्त्याचे सिमेंट क्राँकिटीकरण करण्यात काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या रस्त्याचे काम संथगतीने होत आहे. मनपाच्या हद्दीत असलेल्या गोकुळनगर भागातील रस्त्याच्या कामाला अनेक वर्षानंतर मुहूर्त लागला. मात्र रस्त्याची एक बाजू अद्याप पूर्ण झाली नसून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. याबाबत नागरिकांमध्ये असंतोष आहे.

जिल्ह्यात थंडीचा जोर कायम

नांदेड- जिल्ह्यात मागील काही दिवसापासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. या थंडीमुळे पिकांना पोषक वातावरण ठरत आहे. गहू, हरभरा हे पिके चांगले आहेत. त्यांना थंडीचा लाभ मिळत आहे.नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कापडे परिधान करत असून रात्रीच्या वेळेस ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहेत. शहरातील कलामंदिर ते वजिराबाद चौक रस्त्यापर्यंत असलेल्या स्वेटर विक्रेत्यांच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी पाहण्यास मिळत आहे.

दोषी विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी

नांदेड- नुकत्याच झालेल्या पीएच.डी कोर्स वर्कमध्ये लातूर येथील एका महाविद्यालय केंद्रावर काही विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केला असे निदर्शनास आले. या विद्यार्थ्यांनी व्हॉटस ॲप ग्रुप तयार करून परीक्षेतील उत्तरे एकमेकांना सांगितले. सदर गैरप्रकार निदर्शनास येताच विद्यापीठाने चौकशी समिती नेमून सदर विद्यार्थ्यांची चौकशी केली. तसेच त्या केंद्रावरील सर्वच विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. जो की अत्यंत चुकीचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केला. त्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करायची सोडून विद्यापीठाने त्या केंद्रावरील सर्वांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाने हा निर्णय मागे घेऊन जो दोषी विद्यार्थी आहेत, त्यांचीच परीक्षा घ्यावी, अशी मागणी सिनेट सदस्य प्रा. सुरज दामरे यांनी केली आहे. जे दोषी आहेत, त्यांची परीक्षा घेऊन उर्वरित विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात यावे, असेही दामरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Celebrate National Mathematics Day