किसान दिन साजरा, हॅलो दोनचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST2020-12-29T04:15:58+5:302020-12-29T04:15:58+5:30

प्रशासनाचे दुर्लक्ष नांदेड - प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असतानाही शहरात राजरोसपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. महापालिकेच्या पथकाकडून ...

Celebrate Farmers Day, hello two belt | किसान दिन साजरा, हॅलो दोनचा पट्टा

किसान दिन साजरा, हॅलो दोनचा पट्टा

प्रशासनाचे दुर्लक्ष

नांदेड - प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असतानाही शहरात राजरोसपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. महापालिकेच्या पथकाकडून केवळ नावापुरती कारवाई केली जात असून, अर्थपूर्ण संबंधातून अनेक व्यावसायिकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्लास्टीकच्या वापरामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळे पालिकेने प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईची मोहीम सातत्याने राबविण्याची मागणी पर्यावरणप्रेमी प्रा. किरण शिल्लेवार यांनी केली आहे.

गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष

नांदेड - शहरातील जवळपास सर्वच पानटपऱ्यांवर प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री केली जात आहे. परंतु, अन्न व औषध प्रशासनाकडून या दुकानदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नांदेड शहरातील गुटखा माफियांकडून इतर जिल्ह्यातही गुटखा पुरवला जातो. काही ठिकाणी धाड टाकून कारवाई केली जाते. परंतु, पानटपऱ्या व किराणा दुकानातून होत असलेल्या गुटखा विक्रीला ‘ब्रेक’ लावण्यात अन्न व औषध प्रशासनाला अपयश आले आहे.

Web Title: Celebrate Farmers Day, hello two belt