शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनोविकास शाळेत सीसीटीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 01:03 IST

शहरातील मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा नवा पॅटर्न अंगीकारला असल्याचे समोर आले आहे. दहावी व बारावीच्या आगामी परीक्षा सीसीटीव्हीच्या निगराणीत होणार आहेत.

ठळक मुद्देकंधार येथील उपक्रम : कॉपीमुक्तीतून शैक्षणिक गुणवत्ता साकारण्याचा संकल्प

कंधार : शहरातील मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा नवा पॅटर्न अंगीकारला असल्याचे समोर आले आहे. दहावी व बारावीच्या आगामी परीक्षा सीसीटीव्हीच्या निगराणीत होणार आहेत. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षेतून गुणवत्ता साकारली जाणार असून, कॉपीबहाद्दरांना मात्र आपोआपच चाप बसणार आहे.तालुक्यात जि. प. व राज्य शासनाच्या खाजगी शाळांची संख्या ३०० पेक्षा अधिक आहे. ग्रामीण भागात जि.प.प्राथमिक शाळांचे मोठे शैक्षणिक जाळे आहे. शैक्षणिक गुणवत्तेचा पाया ग्रामीण भागात भक्कम करण्यात या शाळांचे मोठे योगदान असते. ११० शाळांनी डिजिटल सुविधा निर्माण करून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी नेटाने प्रयत्न चालविले आहेत.मनोविकास शाळेने गुणवत्ता वाढीचा प्रयत्न सुरू केले. इयत्ता ५ वी ते १२ पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सुमारे १ हजार ३५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व गुणवत्तावाढीचा ध्यास घेतला. वेतनेत्तर अनुदानातून सुमारे १ लाख ७५ हजार खर्च ‘सीसीटीव्ही’वर केला आणि २८ वर्गखोल्या निगराणीखाली आल्या. वर्गातील अध्ययन-अध्यापन, शिस्त आपोआप या टप्प्यात आली आणि शाळा शहरात चर्चेत आली. मुख्याध्यापक कंठीराम पा. लुंगारे, एन.व्ही.बंडेवार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा संकल्प पूर्ण झाला. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मीकांत मुखेडकर, अ‍ॅड. बाबूराव पुलकुंडवार, लक्ष्मीकांत मामडे, अ‍ॅड. अनिल कोळनूरकर, लक्ष्मीकांत गंजेवार, विकास बिडवई, गणेश महाजन आदींचे सहकार्य मिळाले. २१ फेब्रुवारीपासून बारावी व ७ मार्च पासून दहावीच्या परीक्षा सरू होत आहेत. मनोविकास शाळा ही या परीक्षेचे केंद्र आहे. या केंद्रातील परीक्षा सीसीटीव्ही निगराणीत होणार आहेत. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षेचा मार्ग मोकळा होणार आहे.यामुळे कॉपीबहाद्दरांना आता चाप बसणार आहे. कॉपीबहाद्दरांची पंचाईत होणार असली तरी अभ्यासू विद्यार्थ्यांना ही यंत्रणा अतिशय उपयुक्त ठरणारी आहे.

या शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा शाळा शिस्त, अध्ययनाला प्रभावी चालना देण्यास मदतीची राहील. तसेच १० व १२ परीक्षा परीक्षा कॉपीमुक्त होण्यास उपयुक्त ठरणार आहे.तालुक्यातील शाळेतील परीक्षा केंद्रांनी अशी सुविधा उपलब्ध केल्यास शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास उपयुक्त ठरेल. त्यासाठी परीक्षा केंद्र असलेल्या शाळांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा शिक्षण विभागाला आहे- सतीश व्यवहारे, गटशिक्षणाधिकारी, कंधारशाळेतील शिस्त अबाधित राहण्यासाठी, मुख्याध्यापक कक्षात तासिकेचे निरीक्षण करणे,अध्ययन -अध्यापन व्यवस्थित होते की नाही, याचे अवलोकन करणे सोयीचे झाले.१० वी १२ परीक्षेत कॉपीला आळा बसण्यास यामुळे मदत मिळणार आहे- कंठीराम लुंगारे,मुख्याध्यापक मनोविकास शाळा,कंधार.

 

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणSchoolशाळा