कत्तलीसाठी जाणारी जनावरे पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST2021-04-17T04:16:59+5:302021-04-17T04:16:59+5:30
रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई करा नांदेड : रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला असून, याप्रकरणी काळाबाजार करणाऱ्यावर ...

कत्तलीसाठी जाणारी जनावरे पकडली
रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई करा
नांदेड : रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला असून, याप्रकरणी काळाबाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तानाजी हुस्सेकर, जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. एका इंजेक्शन मागे तीन ते पाच हजार रुपयांची लूट करण्यात येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
पुरोहितांना आर्थिक मदत द्या
नांदेड : शहरी व ग्रामीण भागातील पुरोहितांना दैनंदिन पूजा व आर्थिक विधी करून उपजीविका भागवावी लागते. मात्र लॉकडाऊनमुळे पूजा, विधीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे अडचणी सापडलेल्या पुरोहितांना पाच हजार रुपये आर्थिक साहाय्य करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष निखिल लातूरकर यांनी केली आहे.
३६ हजारांची देशी-विदेशी दारू जप्त
नांदेड : कंधार तालुक्यातील चिखली येथील एका घरावर धाड टाकून उस्माननगर पोलिसांनी ३६ हजार रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत उर्फ कांतू कदम व पांडुरंग कदम या दोघांना ताब्यात घेतले असून, पोलीस नाईक रामेश्वर कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजस्थानी महिला मंडळास ऑक्सिजन यंत्र दान
नांदेड : कोरोनाचे वाढते प्रमाण आणि ऑक्सिजन पुरवठ्याचा वाढत तुटवडा ही परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळावा यासाठी शहरातील तीन दानशूर व्यक्तींनी राजस्थानी महिला मंडळाकडे ऑक्सिजन कॉन्सन्टेटरच्या तीन मशीन दान केल्या आहेत.
बबलू चांडक यांनी गोपालजी चांडक यांच्या स्मरणार्थ एक मशीन, तर शिवप्रसाद तोष्णीवाल परिवार यांनी आपल्या आई-बाबांच्या स्मरणार्थ एक मशीन दिली, तर सर्व सामाजिक महिल्या कार्यकर्त्यांनी मिळून तिसरी मशीन उपलब्ध करून दिली आहे. राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष सुनीता महेश बाहेती यांनी समाजातर्फे ऑक्सिजनच्या मशीन रुग्णांसाठी आणण्याचा संकल्प केला होता. माहेश्वरी जिल्हा सभेचे अध्यक्ष नारायणदास बजाज, विप्र समाजाचे अध्यक्ष दगडू पुरोहीत आणि माहेश्वरी महिला संघटनेच्या अध्यक्ष गीता झंवर यांच्या हस्ते या मशीनचे अनावरण करण्यात आले. यासाठी डॉ. इंदिरा मुंदडा, डॉ. बी. आर. मालू, ॲड. दीपा बियाणी, डॉ. शोभा तोष्णीवाल यांचे मार्गदर्शन लाभले, तर प्रकल्पप्रमुख डॉ. उर्मिला मालू, सोनल तोष्णीवाल, सचिव शांता काबरा, कोषाध्यक्ष सावित्री बजाज यांनी यासाठी पुढाकार घेतला.