रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST2020-12-04T04:50:35+5:302020-12-04T04:50:35+5:30

हळदा येथील सयदू गंगाधर आमटेवाड हे बुधवारी आपल्या शेतात बांधावरील गवत काढत होते. अचानकपणे रानडुकराने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. ...

Cattle attack farmer | रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला

रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला

हळदा येथील सयदू गंगाधर आमटेवाड हे बुधवारी आपल्या शेतात बांधावरील गवत काढत होते. अचानकपणे रानडुकराने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यात सयदू यांच्या मांडीला मोठी जखम झाली. तसेच मानेलाही मार लागला. यावेळी त्यांनी आरडाओरड केली असता शेजारील शेतातील लोक धावत आले. त्यावेळी रानडुकराने पळ काढला. सयदू आमटेवाड यांना भोकरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे कुटुंबीयांनी केली आहे.

(पासपोर्ट फोटो - ०३एनपीएच डीईसी-१३ जेपीजी)

Web Title: Cattle attack farmer