कर्तव्य पार पाडत असताना कॅशियरला बँकेत हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2023 19:48 IST2023-04-13T19:47:36+5:302023-04-13T19:48:25+5:30
बॅंक कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना झाला मृत्यू

कर्तव्य पार पाडत असताना कॅशियरला बँकेत हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान झाला मृत्यू
भोकर : येथील मोंढा परिसरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्तव्यावर असतांना कॅशियर गंगाधर विठ्ठल उमरे (५५) यांचा ऱ्हदय विकाराने मृत्यू झाल्याची घटना दि. १३ रोजी दुपारी घडली आहे.
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कॅशियर पदावर असलेले गंगाधर विठ्ठल उमरे (५५, रा. मोघाळी ता. भोकर) हे आज नेहमीप्रमाणे बॅंकेत कर्तव्य बजावत होते. दरम्यान दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे शाखा व्यवस्थापक रमेश सोळंके, सर्कल इन्स्पेक्टर सुरेश नरवाडे, मोईन पटेल, प्रकाश कुंचलवार, एस.एम. जाधव, सेवक शिवा रामगीरवार आदी सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. येथे उपचार सुरू असताना उमरे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी आर्शिया शेख यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले, मुलगी असा परिवार आहे.