बेडवरुन उठताही येत नाही; लवकरच घरी येऊन दिली जाणार लस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:19 IST2021-07-28T04:19:10+5:302021-07-28T04:19:10+5:30
कॅन्सर रुग्ण, विकलांग, मधुमेह, किडनी आदी अतिगंभीर असलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन त्यास लसीकरण केले जाणार आहे, असे शासनाने सूचित ...

बेडवरुन उठताही येत नाही; लवकरच घरी येऊन दिली जाणार लस !
कॅन्सर रुग्ण, विकलांग, मधुमेह, किडनी आदी अतिगंभीर असलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन त्यास लसीकरण केले जाणार आहे, असे शासनाने सूचित केले आहे. परंतु, तशी सूचना अद्याप जिल्हा पातळीपर्यंत प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे घरी जाऊन लसीकरण करण्याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. जे रुग्ण चालू शकतात, अशांना आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या कॅम्पच्या ठिकाणी येणे आवश्यक आहे. शासन ज्या प्रमाणे सूचना देईल त्या प्रमाणे आरोग्य विभागाच्या वतीने व्यवस्था केली जाणार आहे. कोरोना संकटाच्या काळात प्रत्येकाला लस देण्याचे नियोजन केले जात आहे.
शाळा किंवा ग्रामपंचायतमध्ये केली जाईल व्यवस्था
कोरोनावर लस हाच प्रतिबंधात्मक उपचार आहे. तो प्रभावीही ठरत आहे. त्यामुळे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. वेगवेगळ्या सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या आहेत. गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना घरी जावून लस देण्याबाबतही शासनस्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात या निर्णयाबाबतच्या मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या नाहीत. यावेळी तज्ज्ञ डाॅक्टर, परिचारिका, आशाताई वर्कर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जाणार आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या सूचनांची प्रतीक्षा आरोग्य विभागाला आहे.
हायरिस्कमध्ये कोण?
कॅन्सर, विकलांग, किडनी, मधुमेह अशा रुग्णांच्या घरी जाऊन त्यास लसीकरण करण्यात येणार आहे. कारण अशा रुग्णाला इतरत्र जाणे सोयीचे नसते. त्यामुळे शासनस्तरावर रुग्णांना घरी जावून लस देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
गाईडलाईनप्रमाणे लसीकरण केले जाईल...
राज्य शासनाच्या सुचनेप्रमाणे लसीकरण केले जात आहे. घरी जावून लसीकरण करण्याबाबत कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे याबाबत माहिती घेतली जात आहे.
- डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड.नांदेड : आरोग्यदृष्ट्या हायरिस्कमधील व्यक्तींना घरी जावून लस दिली जाणार आहे, असे शासनाने जाहीर केले असले तरी अजून तशी सूचना आलेली नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
कॅन्सर रुग्ण, विकलांग, मधुमेह, किडणी आदी अतिगंभीर असलेल्या रुग्णांच्या घरी जावून त्यास लसीकरण केले जाणार आहे, असे शासनाने सूचित केले आहे. परंतु, तशी सूचना अद्याप जिल्हा पातळीपर्यंत प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे घरी जावून लसीकरण करण्याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. जे रुग्ण चालू शकतात, अशांना आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या कॅम्पच्या ठिकाणी येणे आवश्यक आहे. शासन ज्या प्रमाणे सूचना देईल त्या प्रमाणे आरोग्य विभागाच्या वतीने व्यवस्था केली जाणार आहे. कोरोना संकटाच्या काळात प्रत्येकाला लस देण्याचे नियोजन केले जात आहे.
शाळा किंवा ग्रामपंचायतमध्ये केली जाईल व्यवस्था
कोरोनावर लस हाच प्रतिबंधात्मक उपचार आहे. तो प्रभावीही ठरत आहे. त्यामुळे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. वेगवेगळ्या सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या आहेत. गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना घरी जावून लस देण्याबाबतही शासनस्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात या निर्णयाबाबतच्या मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या नाहीत. यावेळी तज्ज्ञ डाॅक्टर, परिचारिका, आशाताई वर्कर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जाणार आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या सूचनांची प्रतिक्षा आरोग्य विभागाला आहे.
हायरिस्कमध्ये कोण?
कॅन्सर, विकलांग, किडनी, मधुमेह अशा रुग्णांच्या घरी जाऊन त्यास लसीकरण करण्यात येणार आहे. कारण अशा रुग्णाला इतरत्र जाणे सोयीचे नसते. त्यामुळे शासनस्तरावर रुग्णांना घरी जावून लस देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
गाईडलाईनप्रमाणे लसीकरण केले जाईल...
राज्य शासनाच्या सुचनेप्रमाणे लसीकरण केले जात आहे. घरी जावून लसीकरण करण्याबाबत कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे याबाबत माहिती घेतली जात आहे.
- डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड.