गुरुद्वारा बोर्डाचे कलम ११ रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:28 IST2019-02-23T00:27:25+5:302019-02-23T00:28:00+5:30
गुरुद्वारा बोर्डाचे कलम ११ रद्द करणे तसेच गुरुद्वारा बोर्डावरील ६१ कोटींचे कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी हजूरी क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली़

गुरुद्वारा बोर्डाचे कलम ११ रद्द करा
नांदेड :गुरुद्वारा बोर्डाचे कलम ११ रद्द करणे तसेच गुरुद्वारा बोर्डावरील ६१ कोटींचे कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी हजूरी क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली़
३१ डिसेंबर २०१७ रोजी नांदेड गुरुद्वारा दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते़ यावेळी त्यांनी गुरुद्वारा बोर्डावरील ६१ कोटींचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती़ परंतु, या घोषणेची आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही़ याबाबत सरकारने तातडीने पाऊले उचलून हे कर्ज माफ करावे़ तसेच भाजपा सरकारने नांदेड गुरुद्वाराच्या १९५६ च्या कायद्यात दुरुस्ती करुन त्यामध्ये कलम ११ चा समावेश केला़ या कलमाद्वारे गुरुद्वारा बोर्डाचा अध्यक्ष निवडीचा अधिकार सरकारला आहे़ परंतु, या निर्णयाची पंजप्यारे साहिब आणि शीख समाजात नाराजी आहे़ त्यामुळे सरकारने हे कलम रद्द करुन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु करावी, अशा मागणीचे निवेदन हजूरी क्रांती संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले़ यावेळी मनप्रितसिंग कुंजीवाले, गुरमितसिंग बेदी, मनप्रितसिंग कारागीर, रवींद्रसिंघ पुजारी, सरबजीतसिंघ होटलवाले, राजबीरसिंघ बुंगई, गुणवंतसिंग रागी, विरेंद्रसिंघ बेदी यांची उपस्थिती होती़