हिमायतनगर- भोकर महामार्गावरील बसस्थानक निवारे झाले बिनकामाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST2020-12-29T04:16:04+5:302020-12-29T04:16:04+5:30

हिमायतनगर : हिमायतनगर ते भोकर अंतरातील महामार्गावरील बसथांबे निवाऱ्यांत प्रवशांना बसण्यासाठी व्यवस्था नाही आणि पूर्वीच्या बसथांब्याच्या दूर निवारे ...

Bus stand shelters on Himayatnagar-Bhokar highway became useless | हिमायतनगर- भोकर महामार्गावरील बसस्थानक निवारे झाले बिनकामाचे

हिमायतनगर- भोकर महामार्गावरील बसस्थानक निवारे झाले बिनकामाचे

हिमायतनगर : हिमायतनगर ते भोकर अंतरातील महामार्गावरील बसथांबे निवाऱ्यांत प्रवशांना बसण्यासाठी व्यवस्था नाही आणि पूर्वीच्या बसथांब्याच्या दूर निवारे उभे केल्याने तेथे बस थांबत नाहीत. त्यामुळे निवारे बिनकामाचे झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट निर्मित रस्त्याचे काम करण्यात आले. हिमायतनगर ते भोकरदरम्यानच्या अंतरात गावाचा बसथांबा फाट्याच्या ठिकाणी पूर्वी चांगल्या स्थितीत बांधकाम असलेले बसस्थानक निवारे नांदेड- किनवट राष्ट्रीय महामार्गाचे नव्याने दुपदरीकरण काम सुरू झाल्याने पाडण्यात आले होते. रस्त्याचे काम पूर्णत्वास झाल्याने पूर्वीचे बसथांबा निवारे ठिकाण सोडून एक फर्लांग म्हणजे दीडशे ते दोनशे मीटरचे अंतर सोडून उभे केले. त्या बसथांबा निवाऱ्यामध्ये ना बसण्यासाठी आसनव्यवस्था नाही. केवळ दोन टीन पत्र्याचे शेडचे निवारे उभे करण्यात आले आहेत. गावच्या फाट्यापासून दीडशे ते दोनशे मीटरचे अंतर असल्याने तेथे प्रवासीही जात नाहीत आणि बसही थांबत नसल्याने हिमायतनगर- भोकर महामार्गावरील बसस्थानकावरील निवारे बिनकामाचे झाले आहेत. पूर्वी असलेल्या ठिकाणीच चांगल्या स्थितीत निवारे बांधण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Bus stand shelters on Himayatnagar-Bhokar highway became useless