शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

हाळणी,कुपटीतील आगीत पाच घरे भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:41 IST

हाळणी येथे मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत पाच घरे जळून भस्मसात झाली़ या दुर्घटनेत संसारोपयोगी साहित्य खाक झाल्याने चार कुटुंबे उघड्यावर आली आहेत़

ठळक मुद्देवाढत्या तापमानाचा परिणाम मुखेड, माहूर तालुक्यातील घटनाकुटुंबे रस्त्यावर; लाखो रुपयांचे नुकसान

मुक्रमाबाद : हाळणी येथे मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत पाच घरे जळून भस्मसात झाली़ या दुर्घटनेत संसारोपयोगी साहित्य खाक झाल्याने चार कुटुंबे उघड्यावर आली आहेत़हाळणी येथील हणमंत यादवराव नामाजी, प्रकाश यादवराव नामाजी, विलास यादवराव नामाजी, पुष्पा नारायण नामाजी या शेतकऱ्यांच्या घरांचेआगीत नुकसान झाले़ गावातील बाळु मामा मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. याठिकाणी सुरू असलेल्या कीर्तनासाठी घरातील महिला, पुरुष गेले होते. तर उन्हाळ्यामुळे काहीजण अंगणात झोपले होते. रात्री उशीरा या चार शेतकरी कुंटूबांच्या घरांना अचानक आग लागली. आगीने झपाट्याने रौद्ररुप धारण केल्याने चारही घरे जळून खाक झाली. उदगीर येथील अग्निशामक दलाची गाडी मागविण्यात आली़ मात्र तोपर्यंत या चारही घरांचे मोठे नुकसान झाले होते़ मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गडीमे, जमादार सुरनर, तलाठी एम़जी़ जमदाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़ यावेळी दत्ता पाटील, गोपाळ पाटील, हणमंत मलापुरे, जळबा देवकत्ते, काशीनाथ राठोड उपस्थित होते.दरम्यान माहूर तालुक्यातील कुपटी येथे दिलीप चोखाजी कवडे यांच्या राहात्या शेतातील घराला मंगळवारला दुपारी दोनच्या सुमारात अचानक लागलेल्या आगीत जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले़यात स्प्रीकरचे ४० पाईप, बैलगाडी, गहू, ज्वारी, घरातील एलसीडी, फॅन, चना, कांदे, लसुण, घराचे दारे, खिडक्या व शेतातील पूर्ण साहित्य जळून खाक झाले़ घरामध्ये पूर्ण कुटूंब दुपारच्या वेळेस आराम करात होते. घरातील सिलेंडर, शेगडी पूर्णपणे जळून खाक झाली़ गावातील एका व्यक्तीने धाडस करुन ते सिलेंडर टाकी घराच्या पत्रावरुन जावून बाहेर काढली़ त्यामुळे मोठी जीवीत हानी टळळी़ घराला आग लागताच गावातील नागरीक धावून आले़ मात्र वा-याचा जोर जास्त असल्याने आग विजविण्यास विलंब लागला़ तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले होते़आगीत ८७ लाखांचे बगॅस खाक

  • लक्ष्मीनगर येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना परिसरातील बगॅसला लाग लागून ८७ लाखाचे नुकसान झाले़ कारखाना परिसरातील बगॅसला ३० एप्रिल रोजी तापमान वाढलेले असताना दुपारी १़४५ च्या सुमारास अचानक आग लागली़
  • या आगीमध्ये कारखान्याचे सुमारे सात हजार मे़टन बगॅस जळून खाक झाला़ या आगीमध्ये कारखान्याचे अंदाजे ८७ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कारखाना प्रशासनाने व्यक्त केला आहे़ या घटनेप्रकरणी विनायक कदम यांच्या तक्रारीवरून बारड पोलिस ठाण्यात प्रकरणाची नोंद घेण्यात आली.
टॅग्स :NandedनांदेडfireआगHomeघरFamilyपरिवार