लोह्यात पावणेदोन लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:22 IST2021-08-13T04:22:44+5:302021-08-13T04:22:44+5:30

दुप्पट पैसे काढून देतो म्हणून वृद्धेला गंडविले ६० वर्षावरील योजनेतील पैसे दुप्पट काढून देतो म्हणून एका ७० वर्षीय वृद्धेला ...

A burglary of Rs | लोह्यात पावणेदोन लाखांची घरफोडी

लोह्यात पावणेदोन लाखांची घरफोडी

दुप्पट पैसे काढून देतो म्हणून वृद्धेला गंडविले

६० वर्षावरील योजनेतील पैसे दुप्पट काढून देतो म्हणून एका ७० वर्षीय वृद्धेला गंडविल्याची घटना बिलोली येथे घडली. भामट्याने या महिलेच्या कानातील ३० हजार रुपयांचे कुंडल काढून घेऊन पोबारा केला.

देगलूर तालुक्यातील तमलूर येथील साराबाई मृगुसाली आकुलवार (वय ७०वर्षे) ही महिला बिलोली येथे जुन्या बसस्थानकात मंगळवारी आली होती. दुपारी १ च्या सुमारास भामट्याने तिच्याशी गप्पा करुन तिला ६० वर्षाचे पैसे दुप्पट काढून देतो म्हणून सांगितले. यावेळी त्याने वृद्धेच्या कानातील एक तोळ्याचे सोन्याचे कुंडल काढून घेतले अन्‌ तेथून पोबारा केला. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साराबाई आकुलवार यांनी बिलोली ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A burglary of Rs