लोहा येथे ६२ हजार रुपयांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:16 IST2021-03-22T04:16:22+5:302021-03-22T04:16:22+5:30

असर्जन येथून दुचाकी लांबविली नांदेड : असर्जन येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केली. ही घटना २० मार्च ...

Burglary of Rs 62,000 at Loha | लोहा येथे ६२ हजार रुपयांची घरफोडी

लोहा येथे ६२ हजार रुपयांची घरफोडी

असर्जन येथून दुचाकी लांबविली

नांदेड : असर्जन येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केली. ही घटना २० मार्च रोजी घडली. ऋषिकेश गणेश बकाल यांनी एम.एच. २६ एआय ५५६९ या क्रमांकाची दुचाकी घरासमोर उभी केली होती. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पारवा येथे दानपेटीतील रक्कम लंपास

नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील पारवा येथे मंदिराच्या दानपेटीतील २५ हजार रुपये लांबविण्यात आले. ही घटना १९ मार्च रोजी घडली. पारवा येथील महादेव मंदिरातील दानपेटी चोरट्याने फोडली. या प्रकरणात गणेश दत्तराम जाधव यांच्या तक्रारीवरुन हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सावरगाव येथे ४३ हजार रुपये लंपास

नांदेड : माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे सावरगाव नसरत येथे चोरट्याने घर फोडून ४३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २० मार्च रोजी घडली. देवराव विश्वनाथ कदम यांची मुलगी घर उघडे ठेवून झोपली होती. चोरट्याने आत प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने आणि कपडे असलेली सुटकेस लांबविली. या प्रकरणात माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

नांदेड : अबचलनगर परिसरात मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. यावेळी अडीच हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. २० मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Burglary of Rs 62,000 at Loha