पाटाेद्यात घरफोडी, स्वयंपाकाचा गॅस लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:22 IST2021-09-05T04:22:38+5:302021-09-05T04:22:38+5:30

जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या दोन घटना जिल्ह्यात भाग्यनगर आणि हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या. बालाजी माधवराव तुप्पेकर ...

Burglary in Patna, cooking gas lamps | पाटाेद्यात घरफोडी, स्वयंपाकाचा गॅस लंपास

पाटाेद्यात घरफोडी, स्वयंपाकाचा गॅस लंपास

जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या दोन घटना

जिल्ह्यात भाग्यनगर आणि हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या. बालाजी माधवराव तुप्पेकर यांनी कॅनॉल रोड भागात साई मातृसेवा हॉस्पिटलसमोर दुचाकी उभी केली होती. तर हदगावला शंकर पार्वती मंगल कार्यालयापुढील प्रभाकर देवीदास चव्हाण यांची दुचाकी लांबविण्यात आली.

विद्युत मोटारीचे पाइप नेले कापून

कंधार तालुक्यातील मौजे नागलगाव शिवारात चोरट्याने शेतातील विहिरीवर बसविण्यात आलेले मोटारीचे २२ हजार रुपये किमतीचे पाइप कापून नेले. ही घटना १ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणात गणेश मारुती जाधव यांच्या तक्रारीवरून कंधार ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

तीन जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या धाडी

जिल्ह्यात नांदेड ग्रामीण, इतवारा आणि किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडी टाकल्या. ग्रामीण हद्दीत दोन हजार रुपये, इतवारात दोन हजार आणि किनवट येथे दीड हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: Burglary in Patna, cooking gas lamps