लोह्यात घरफोडी, पावणेदोन लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:23 IST2021-08-25T04:23:20+5:302021-08-25T04:23:20+5:30

सुधा प्रकल्प येथून दुचाकी लांबविली भोकर तालुक्यातील किनाळा शिवारात असलेल्या सुधा प्रकल्प येथून चोरट्याने ४० हजार रुपये किमतीची दुचाकी ...

Burglary in iron, 52 lakh lamps | लोह्यात घरफोडी, पावणेदोन लाख लंपास

लोह्यात घरफोडी, पावणेदोन लाख लंपास

सुधा प्रकल्प येथून दुचाकी लांबविली

भोकर तालुक्यातील किनाळा शिवारात असलेल्या सुधा प्रकल्प येथून चोरट्याने ४० हजार रुपये किमतीची दुचाकी लांबविली. ही घटना ५ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात सदाशिव लक्ष्मण गुंजकर यांच्या तक्रारीवरून भोकर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

हॉर्न वाजविल्याने ब्लेडने केला हल्ला

शहरातील शिवाजीनगर भागात महात्मा फुले मार्केट रस्त्यावर हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून संजय केशव सोनकांबळे या चालकावर आरोपीने ब्लेडने हल्ला केला. ही घटना २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. या प्रकरणात पप्पू विष्णू गजभारे, रा. आंबेडकरनगर याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

देगलूर तालुक्यातील खानापूर येथे रवी उत्तमराव इंगळे या शेतकऱ्याने अज्ञात कारणावरून शेतात विष प्राशन केले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. ही घटना २३ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी रवीकुमार वाळके यांच्या माहितीवरून देगलूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Burglary in iron, 52 lakh lamps