सिडको परिसरात घरफोडी ;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:48+5:302021-06-09T04:22:48+5:30

नांदेड : चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरातील टीव्हीसह सुमारे ४३ ते ४५ हजार रूपये किमतीचे सोने आणि चांदीचे ...

Burglary in CIDCO area; | सिडको परिसरात घरफोडी ;

सिडको परिसरात घरफोडी ;

नांदेड : चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरातील टीव्हीसह सुमारे ४३ ते ४५ हजार रूपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना २ जून रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान घडली.

सिडको वसाहती अंतर्गत असलेल्या पाण्याच्या टाकी शेजारील परिसरातील रहिवासी शरद उद्धवराव डहाळे यांचे घराला २ जून रोजी कुलूप लावून गेले होते. शरद डहाळे यांच्या घरात ही संधी साधून चोरट्यांनी दरवाजावरील कडी-कोंडी तोडून घरात प्रवेश मिळविला. दरम्यान, चोरट्यांनी घरामधील कपाटातील लॉकर तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि टीव्ही. असा एकूण सुमारे ४३ ते ४५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे,

याप्रकरणी शरद डहाळे यांनी दिलेल्या तक्रारीचे आधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सिडको-हडको परिसरात चोरी तथा घरफोड्यांचे सत्र सुरू असताना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील अत्यंत कार्यतत्पर ‘डीबी’ अर्थात गुन्हे शोध पथक सध्या कुठे व्यस्त आहे, असा संतप्त सवाल नवीन नांदेड परिसरातील व्यापारी तसेच सर्व सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Web Title: Burglary in CIDCO area;