बुद्ध विचारांनीच जीवनात क्रांती होईल : डॉ. सिद्धार्थ एम. जोंधळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:18+5:302021-05-30T04:16:18+5:30
तालुक्यातील खुरगाव येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो, ...

बुद्ध विचारांनीच जीवनात क्रांती होईल : डॉ. सिद्धार्थ एम. जोंधळे
तालुक्यातील खुरगाव येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो, भंते संघरत्न, भंते चंद्रमणी, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते शीलानंद, भंते सुनंद, भंते संघमित्र, भंते सुमेध, भंते सुदत्त, भंते सुजात, भंते शीलभद्र, भंते सुगत या भिक्खू संघासह डॉ. शुद्धोधन गायकवाड आदी उपस्थित होते.
डॉ. शुद्धोधन गायकवाड म्हणाले, ऋषीपठणच्या माध्यमातून इथे फार मोठे ऐतिहासिक कार्य घडत आहे. अनेक बौद्ध उपासक-उपासिकांना येथे मनःशांती लाभते तसेच वैचारिक विकास घडून येतो. दरम्यान, गायक कलाकार, वाद्यवृंदांनाही सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सुभाष लोकरे आणि संचाचा भीमबुद्ध गीतगायनाचा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सिद्धांत इंगोले, अपेक्षा इंगोले, चंद्रमणी निवडंगे, केशव खिराडे, मोहन ठाकूर, खाजामियाँ, भुजबळे, कावळे, सोनकांबळे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन धम्मसेवक गंगाधर ढवळे यांनी केले. आभार एस. एच. हिंगोले यांनी मानले.
भिक्खू संघाला आर्थिक दान
खुरगाव येथे प्रशिक्षण भवन, भिक्खू संघाचे निवासस्थान, विपश्यना भवनचे बांधकाम होत आहे. येथील भिक्खू संघाने उपासकांना आर्थिक दान तथा वस्तूंच्या स्वरुपात दान पारमिता करण्याबाबत आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत यशवंत उबारे १ लाख, कपिल नरवाडे २२,००० रुपये, डॉ. सिद्धार्थ जोंधळे ५ हजार, तर रेखा सुभाष मस्के यांनी ५ हजार असे आर्थिक दान दिले आहे, तर वस्तूंच्या स्वरुपात धम्मसरिता महिला मंडळ पिवळी गिरणी १४० प्लेट, उपासिका हनमंते आई ३० ग्लास, खुर्च्यांमध्ये मंगेश कदम २४, कांबळे सप्तगिरी काॅलनी १२, अनिता हिंगोले १२, पीआय नरवाडे २४ खुर्च्या असे दान प्रशिक्षण केंद्रास प्राप्त झाले.