बुद्ध धम्म म्हणजे मानवी जीवनाचे सौंदर्यशास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:16 IST2021-05-24T04:16:58+5:302021-05-24T04:16:58+5:30
झेन मास्टर सुदस्सन यांनी ‘आधुनिक विज्ञान आणि बुद्ध धम्म’ या विषयावर ऑनलाइन संवाद साधला. ते म्हणाले की, ...

बुद्ध धम्म म्हणजे मानवी जीवनाचे सौंदर्यशास्त्र
झेन मास्टर सुदस्सन यांनी ‘आधुनिक विज्ञान आणि बुद्ध धम्म’ या विषयावर ऑनलाइन संवाद साधला. ते म्हणाले की, आजचे विज्ञान सतत शोध आणि संशोधनाचे आहे. त्याला अंत नाही. सकारात्मक आणि विधायक जीवनपद्धतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याचा विकास बौद्ध धम्मात अंतर्भूत आहे. जगातील अनेक वैज्ञानिक सिद्धांत बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाशी संबंधित आहेत. आधुनिक मनोविज्ञानाबरोबरच बुद्ध धम्माचीसुद्धा आवश्यकता आहे. धम्म आणि विज्ञान यांनी जगाचे नियमन केले पाहिजे. धम्माशिवाय विज्ञान भयंकर आहे, विध्वंसक आहे. समाजकारण आणि राजकारण या मानवी जीवनाच्या दोन्ही बाजू महत्त्वाच्या आहेत. परंतु राजकारण आणि धम्म, समाजकारण आणि धम्म अशी सांगड घातली पाहिजे. या कार्यक्रमासाठी महामंडळाच्या वतीने अरविंद निकोसे, सीमा मेश्राम, छाया खोब्रागडे, सुनंदा बोदिले, सुरेश खोब्रागडे, देवानंद सुटे यांनी परिश्रम घेतले.