शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

प्रेमसंबंधातून क्रूर हत्या; खून करून मुलीच्या प्रियकरास फेकले विहिरीत, बाप-लेकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:31 IST

दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी

तामसा (जि. नांदेड) : हिमायतनगर तालुक्यातील कांडली येथे एका १७ वर्षीय मुलास विहिरीत फेकून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. प्रेमसंबंधातून झालेल्या या क्रूर हत्येमध्ये युवकाचा खून करून ते एका पोत्यात बांधून भोकर तालुक्यातील शिंगारवाडी शिवारातील एका विहिरीत फेकून देण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तामसा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तामसा पोलिसांनी दोन आरोपींना २९ ऑक्टोबरला भोकर न्यायालयात नेले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मृत नकुल संजय पावडे (वय १७, रा. कांडली बु. ता. हिमायतनगर) येथील असून त्याचे गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. शनिवार रात्रीपासून नकुल घरी न परतल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला परंतु तो कुठेही आढळला नाही. त्यामुळे रविवारी नकुलच्या वडिलांनी तामसा पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून तपास सुरू केला. मंगळवारच्या दिवशी नांदेड गुन्हा शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

प्रेमसंबंधामुळे आम्ही त्याचा खून केलाआरोपी गणेश संभाजी दारेवाड (३९) याची मुलगी आणि दुसरा आरोपी विशाल गणेश दारेवाड (१९) याच्या बहिणीसोबत नकुलचे प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधातूनच आम्ही त्याचा खून केल्याचे सांगितले. सदर माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी हाके यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक सहदेव खेडेकर, पोलिस उपनिरीक्षक नरोटे शिंगारवाडी शिवारातील घटनास्थळ गाठले. स्थानिकांच्या मदतीने नकुलचे शव विहिरीबाहेर काढून पंचांसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा तपास तामसा पोलिस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Love affair leads to brutal murder; father, son arrested.

Web Summary : A 17-year-old boy was murdered and thrown into a well in Kandli due to a love affair. Police arrested the girl's father and brother, who confessed to the crime. The body was recovered from a well in Shingarwadi.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड