शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सख्ख्या भावांची साथ सुटली! भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दूसरा गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:19 IST

अज्ञात भरधाव वेगतील चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक, अर्धापूर बायपास रोडवरील घटना

- गोविंद टेकाळेअर्धापूर (जिल्हा नांदेड): अर्धापूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. यातील एका भावाचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. हा अपघात दि. २८ एप्रिल रोजी सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास अर्धापूर बायपास रोडवर घडला. या जखमींना नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले असता यातील एकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी (बु.) येथील अनसाजी उत्तमराव शिंदे (वय ३५ वर्षे) आणि राजू उत्तमराव शिंदे (वय २९ वर्षे ) हे दोघे सख्खे भाऊ मंगळवारी सकाळी मोटारसायकल क्रं. (एम. एच. २६ बी. के. ८७०१) ने  नांदेडकडे जात होते. ते अर्धापूर-नांदेड महामार्गावरील अर्धापूर बायपास रोडवर येताच भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात राजू उत्तमराव शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ अनसाजी उत्तमराव शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आदित्य लाकूळे, अंकुश वडजे, शैलेष शिरसे सेवक वसंतराव सिनगारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान राजू उत्तमराव शिंदे यांचा मृत्यू झाला. वसमत फाटा महामार्ग पोलीसांनी लगेचच वाहतूक सुरळीत केली. अशी माहिती महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी शेख नईम यांनी दिली आहे.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात