११०० मोलकरणींच्या रोटीची सोय, अडीच हजार जणींचे पोट कसे भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:17 IST2021-04-17T04:17:06+5:302021-04-17T04:17:06+5:30

............चौकट नांदेडात १ हजार १०० नोंदणी- नांदेड शहरात जवळपास साडेतीन हजार मोलकरणींची संख्या आहे. यामध्ये घरभांडी, कपडे धुणे, फरशी ...

Bread for 1100 maids, how to feed two and a half thousand women? | ११०० मोलकरणींच्या रोटीची सोय, अडीच हजार जणींचे पोट कसे भरणार?

११०० मोलकरणींच्या रोटीची सोय, अडीच हजार जणींचे पोट कसे भरणार?

............चौकट

नांदेडात १ हजार १०० नोंदणी- नांदेड शहरात जवळपास साडेतीन हजार मोलकरणींची संख्या आहे. यामध्ये घरभांडी, कपडे धुणे, फरशी साफसफाई तसेच स्वंयपाकाचे काम करणार्या महिलांची संख्या मोठी आहे. मात्र या महिलांनी कामगार कार्यालयात नोंदणी केली नाही. केवळ १ हजार १०० महिलांनीच अधिकृत नोंदणी केली आहे. नोंदणीची प्रक्रिया अनेक महिलांना माहित नाही. तसेच कार्यालय कुठे आहे, याचाही पत्ता नाही. त्यामुळे नोंदणी करणार्या महिलांची संख्या कमी आहे.

.......... चौकट

मोलकरणीच्या नोंदचा घोळ- राज्य शासनाने नोंदणीकृत मोलकरणीला आर्थिक मदत देण्याची घोषणा केल्यानंतर कामगार कार्यालयात नोंदणीकृत मोलकरणीची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले. ज्यांनी नोंदणी केली अशाच मोलकरणीला ही मदत पोहचणार असल्याने उर्वरित मोलकरणीच्या रोटीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या मोलकरणींना सुद्धा मदतीची गरज असून यासाठी कामगार संघटनांनी मागणी केली आहे.

चौकट- मोलकरणींची प्रतिक्रिया

१. मला एक मुलगा, एक मुलगी असून मी घरभांडी घासून माझ्या मुलांना सांभाळते. घर चालवते. मागील वर्षी सहा, सात महिने घरीच बसावे लागले. या उन्हाळ्यातही दोन महिन्यापासून घरीच बसून आहे. लोक कामासाठी येवू नका, म्हणून सांगत आहेत. त्यामुळे जगायचे कसे, हा प्रश्न आहे. -सुनिता कांबळे, तरोडा. खु.

२. शासनाने आम्हाला दरमहा १ हजार रूपये द्यावेत. कारण घरभांडी करण्यासाठी कोणीही बोलावत नाही. कोरोनामुळे त्यांना आमची भीती वाटते. पण आमचे पोट धुण्याभांड्यावरच आहे. तुटपुंजी मदत नकाे. कायमस्वरूपी मदत करावी. - मनिषा आगळे, सिद्धांतनगर.

Web Title: Bread for 1100 maids, how to feed two and a half thousand women?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.