दोन अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:59 IST2018-01-05T00:59:27+5:302018-01-05T00:59:31+5:30

मुदखेड तालुक्यातील बारड व नांदेडातील विमानतळ पोलीस ठाण्यातंर्गत २ व ३ जानेवारी रोजी झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे नोंदविले.

 Both of them died on the spot | दोन अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

दोन अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड/मुदखेड : मुदखेड तालुक्यातील बारड व नांदेडातील विमानतळ पोलीस ठाण्यातंर्गत २ व ३ जानेवारी रोजी झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे नोंदविले.
मौजे पाटनूर ते पाटनूर घाट रोडवर एमएच-१४-एपी-७६८३ या क्रमाकाच्या मोटारसायकलवर बसून प्रकाश पतंगे (वय ४५, रा. पाटनूर) व सुरेश पतंगे (वय ३५) हे दोघे शेताकडे जात होते. घाटामधून येणाºया एमएच-२६-एच-००६३ या क्रमांकाच्या वेगातील टेम्पोने मोटारसायकलला धडक दिली. यात प्रकाश पतंगे यांचा जागीच मृत्यू झाला तर सुरेश पतंगे जखमी झाले. बारड पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. सपोनि आर. के. डमाळे तपास करीत आहेत. फळ मार्केट ते माळटेकडी जाणाºया रोडवर एमएच-२६-बीएल १९७८ या क्रमांकाच्या वेगातील बसने मोटारसायकलला धडक दिली. यात शेख सुतलान शेख युसूफ (वय २२, रा. म्हाळजा) यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी शेख रफीक शेख युसूफ यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title:  Both of them died on the spot