शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
6
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
7
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
8
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
9
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
10
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
11
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
12
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
13
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
14
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
15
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
16
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
17
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
18
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
19
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
20
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!

भाजपाने मुंडे कुटुंबाला भरपूर दिल्याची दोन्ही बहिणींना जाणीव - विनायक मेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 17:36 IST

Vinayak Mete Vs Pankaja Munde News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल राज्य सरकारला मार्गदर्शन केले नाही.

ठळक मुद्देसरकारकडून सर्वच समाजाचे प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळलेआघाडी सरकारकडून जातीय राजकारण सुरू आहे.

नांदेड : भाजपाने मुंडे कुटुंबाला खूप काही दिले. याची जाणीव आमदार पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना आहे. त्यामुळे पंकजा मुंडे कोणताही चुकीचा निर्णय घेतील, असे आपल्याला वाटत नाही, असे मत  शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे आज व्यक्त केले. तसेच खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले. पण त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामे द्यावे, तरच ते स्वीकारले तरी जातील, अशी प्रतिक्रिया देत आ. मेटे यांनी मुंडे यांच्याकडून राजीनामासत्र नाट्य सुरू असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. ( Both sisters are aware that BJP has given a lot to Munde family, says Vinayak Mete ) 

देगलूर- बिलोली विधानसभा मतदार संघात शिवसंग्रामच्या माध्यमातून सुरेखा पुणेकर यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. यानिमित्ताने मेटे यांनी नांदेड दौरा केला असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्यांच्या समवेत शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, सचिन पाटील हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आमदार मेटे यांनी राज्य सरकारवर सडकून टिका केली. ते म्हणाले, तत्कालिन मुख्यमंत्री फडणविस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे सरकारला टिकवता आले नाही. त्यांनी न्यायालयात चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोपही मेटे यांनी केला. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल राज्य सरकारला मार्गदर्शन केले नाही. हे मराठा समाजाचे दुर्देव असल्याची टीका आमदार विनायक मेटे यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची इच्छा आहे की नाही मला माहित नाही. पण सरकार ज्या पद्धतीने मराठा आरक्षणावर भूमिका घेत आहे. त्यावरून मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही, असे स्पष्ट दिसत असल्याची टीका त्यांनी केली. 

समाजाचे प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळलेराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल राज्य सरकारला मार्गदर्शन केले नाही. हे मराठा समाजाचे दुर्देव असल्याची टीका आमदार विनायक मेटे यांनी केली. आजघडीला सरकारकडून सर्वच समाजाचे प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळले जात आहेत. आघाडी सरकारकडून जातीय राजकारण सुरू आहे. कोणत्याही समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारची नाही. त्यात मराठा आरक्षण न्यायालयात न टिकण्यास आघाडी सरकारच जबाबदार असून मराठा आरक्षण समिती कुचकामी ठरल्याची टीका ही त्यांनी केली.  

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेNandedनांदेडPankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेBJPभाजपा