शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:51 IST

यंदाचे शैक्षणिक सत्र १५ जून पासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत याचे नियोजन सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून करण्यात आले असून सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसाडेतीन लाख विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियानचे नियोजन

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : यंदाचे शैक्षणिक सत्र १५ जून पासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत याचे नियोजन सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून करण्यात आले असून सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम- २००९ नुसार एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच कोणतेही बालक शाळाबाह्य राहणार नाही, यावर भर दिला जात आहे. या अनुषंगानेच जिल्हा परिषद, नगरपालिकांसह खाजगी अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांमध्ये या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असून यासाठीची पुस्तके बालभारतीच्या डेपोमधून विषयनिहाय तालुका ठिकाणी रवाना केली आहेत. या पुस्तकांचे केंद्रस्तरावरुन शाळांना वितरण करण्यात येत आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ५२ हजार ७६८ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्याचे नियोजन आहे. यामध्ये बिलोली तालुक्यासाठी मराठी माध्यमाच्या १७,५७३, उर्दू माध्यमाच्या ५२८ आणि सेमी इंग्रजी ४,१०५ अशा १८,१०१ विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येणार आहेत. धर्माबाद- मराठी ९,४०३, उर्दू १२२० आणि सेमी २४४४ असे १०,६२३, नायगाव- मराठी २१,२४३, सेमी इंग्रजी १४६८ अशा २१,२४३, देगलूर- मराठी २३,९३८, उर्दू- १९२७, सेमी इंग्रजी ३,०५६ अशा २५,८६५, नांदेड- मराठी- १९, ३२३, उर्दू ९३५ आणि सेमी २५२ अशा २०,२५८, अर्धापूर- मराठी १२,१०५, उर्दू- २०४२ आणि सेमी ११९६ अशा १४,१४७, मुदखेड- मराठी- १४,५३५, उर्दू- ११७७ आणि सेमी- ६९० अशा १५,७१२, किनवट- मराठी ३०,४६३, उर्दू- १६४३, सेमी- ४,००० अशा ३२,१०६, माहूर- मराठी- १३,०००, उर्दू - ६७७ आणि सेमी- १७९३ अशा १६,६७७, हदगाव- मराठी- ३१,३३७, उर्दू- ९८९, सेमी- ५,३६० अशा ३२३२६ विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येणार आहे तर हिमायतनगर तालुक्यात १३,९३२, मुखेड- ४०,४५५, भोकर-१९,१०२, उमरी-१२,८२१, कंधार- ३०,१३५ तर लोहा तालुक्यातील ३२५,२६५ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.बालभारतीच्या डेपोमधून विषयनिहाय पुस्तके भरलेल्या गाड्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या असून तेथून त्या केंद्रस्तरावर जाणार आहेत. केंद्रस्तरावरुन संबंधित ठिकाणचे मुख्याध्यापक आपल्या शाळांसाठी पुस्तके घेऊन जातील.---इयत्ता पहिली ते आठवीसाठी युडायस पटसंख्येवरुन जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या ३ लाख ५२ हजार ७६८ विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन पद्धतीने पाठ्यपुस्तकांची मागणी तालुकास्तरावरुन आली होती. १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने पुस्तकांचे जिल्हाभरात वितरण सुरू आहे.-विलास ढवळेसहा. प्रकल्प अधिकारीसर्व शिक्षा विभाग

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाStudentविद्यार्थी