वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:39 IST2021-09-02T04:39:59+5:302021-09-02T04:39:59+5:30
जोरदार पावसामुळे ३० ऑगस्ट रोजी गंगनबीड येथील ओढ्याला पूर आला होता. या ओढ्यात उमेश रामराव मदेबैनवाड हा २६ वर्षीय ...

वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले
जोरदार पावसामुळे ३० ऑगस्ट रोजी गंगनबीड येथील ओढ्याला पूर आला होता. या ओढ्यात उमेश रामराव मदेबैनवाड हा २६ वर्षीय युवक वाहून गेला होता. त्याचा शोध सुरू होता. १ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मन्याड नदीपात्राच्या बॅक वॉटरमध्ये ऋषीमंदिराजवळ म्हणजेच घटनास्थळापासून तीन किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह सापडला.
दुसऱ्या घटनेत लोहा तालुक्यातील सावरगाव येथे ३० ऑगस्ट रोजी पार्वतीबाई संभाजी दगडगावे या ओढ्यात वाहून गेल्या होत्या. त्यांचा मृतदेह १ सप्टेंबर रोजी दुपारी २च्या सुमारास त्र्यंबक जाधव यांच्या शेतात मालदराजवळ सापडला. घटनास्थळापासून २ किलोमीटर अंतरावर मृतदेह आढळला. या दोन्ही घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी ३१ ऑगस्ट रोजी भेट देऊन शोधकार्याला वेग देण्याच्या सूचना दिल्या होत्या.