शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

रक्ताच्या नात्याला गालबोट; जुन्या वादातून मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 14:39 IST

man killed younger brother in old dispute : रक्ताच्या नात्याला हादरा देणारी धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव म.येथे घडली आहे.

ठळक मुद्देघराजवळील रस्त्यावर अडवून चाकूने वार केले

अर्धापूर (नांदेड ) :  तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे जुन्या भांडणातून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी भावास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी जी. जी. रांजनकर, पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनीही भेट दिली व पुढील तपासा बाबात सूचना केल्या.

दि.६ जुलै मंगळावर रोजी सायंकाळी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील दिगंबर अमृतर कल्याणकर वय ४८ वर्ष यांनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवत छोटा भाऊ अनिल दिगंबर कल्याणकर वय ४५ याला घराजवळील रस्त्यावर आडवले व मागच्या भांडणावरून वाद सुरु केला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि दिगंबरने भावावर चाकूचे वार केले. यामध्ये जखमी होऊन रक्तबंबाळ झालेला लहान भाऊ अनिल हा जागीच ठार झाला.

अर्धापूर पोलिसांनी रात्रीच आरोपीला ताब्यात घेतले. मयताचा मुलगा अमोल अनिल कल्याणकर याच्या फिर्यादीवरून दिगंबर कल्याणकर यांच्याविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे हे करीत आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू